नोटाबंदीची पाच वर्षे! लोकांकडील वाढली कॅश; आतापर्यंतच्या उच्चांकावर

r
r

नवी दिल्ली : सरकारद्वारे नोटबंदी केल्याच्या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या नोटबंदीनंतर आता हळूहळू लोकांकडील करन्सी वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर 2021 च्या पंधरवड्यामध्ये लोकांकडे 28.30 लाख कोटी रुपयाच्या रेकॉर्ड स्तरावरील करन्सी लोकांकडे आहे. 4 नोव्हेंबर 2016 ला 17.97 लाख कोटी रुपयांच्या टप्प्यावरुन 57.48 टक्के अथवा 10.33 लाख कोटी रुपयांनी अधिक आहेत. 25 नोव्हेंबर 2016 ला नोंद असणाऱ्या 9.11 लाख कोटी रुपयांपेक्षा 211 टक्क्यांनी ही नगद वाढली आहे.

r
अजित पवारांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, शरद पवारांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशातील पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी आणली होती. चलनात असणाऱ्या या नोटा एकाएकी बाद ठरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर पाचशेच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या आणि दोन हजारची नोट देखील बाजारात आणली गेली मात्र हजारची नोट कायमची बाद करण्यात आली. या निर्णयाचे दूरगामी नकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्याचं अर्थतज्ज्ञ सांगतात.

सिस्टीममध्ये वाढतेय नगद

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, 23 ऑक्टोबर 2020 ला संपलेल्या पंधरवड्यामध्ये सणाच्या आधी लोकांकडील नगदीमध्ये 15,582 कोटी रुपयांची वाढ झाली. वर्षिक आधारावर यामध्ये 8.5 टक्के अथवा 2.21 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

r
केदारनाथाच्या चरणी PM मोदी; आदि शंकराचार्यांच्या मुर्तीचं केलं अनावरण

नोव्हेंबर 2016 मध्ये पाचशे आणि हजारच्या नोटा परत घेतल्यानंतर 4 नोव्हेंबर 2016 ला लोकांकडे असणारी 17.97 लाख कोटी रुपयांची नगद जानेवारी 2017 मध्ये घट होऊन फक्त 7.8 लाख कोटी रुपयेच राहिली होती. सरकार आणि आरबीआयद्वारे कॅशलेस सोसायटीसाठी पावलं उचलूनही यंत्रणेमध्ये नगद सातत्याने वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com