esakal | जगातील पाच अंधापैकी एक भारतात, पण अद्यापही नाही नॅशनल कॉर्निअल ग्रीड
sakal

बोलून बातमी शोधा

need of national cornial greed in india

जगातील प्रत्येक पाच अंधांपैकी एक अंध भारतात आहे. वर्षाकाठी ३५ हजार नेत्र प्रत्यारोपणाची गरज आहे. मात्र, नेत्रदानाच्या अल्प प्रमाणामुळे अवघ्या १२ ते १३ हजार बुबुळ प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात.

जगातील पाच अंधापैकी एक भारतात, पण अद्यापही नाही नॅशनल कॉर्निअल ग्रीड

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : देशभरातील नेत्रपेढ्यांना जोडणारा दुवा म्हणून 'नॅशनल कॉर्निअल ग्रीड'ची गरज होती. यासाठी दिल्लीतील एम्सने पुढाकार घेतला होता. मात्र, मध्ये कोणीतरी निभावलेल्या शुक्राचार्याच्या भूमिकेमुळे नॅशनल कॉर्निअल ग्रीड तयार झाले नाही. ग्रीड तयार झाले असते तर एका क्लिकवर देशात नेत्रांच्या प्रतीक्षेतील व्यक्ती लाभार्थी ठरले असते. यामुले अंधत्व निवारणाच्या सत्कर्मालाच खीळ बसली आहे. 

हेही वाचा - रहीमभाई अन् कावळ्यांची अनोखी मैत्री; हॉर्न वाजताच जमतो थवा, अंगाखांद्यावर खेळल्यानंतर...

जगातील प्रत्येक पाच अंधांपैकी एक अंध भारतात आहे. वर्षाकाठी ३५ हजार नेत्र प्रत्यारोपणाची गरज आहे. मात्र, नेत्रदानाच्या अल्प प्रमाणामुळे अवघ्या १२ ते १३ हजार बुबुळ प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. यामुळे दानाची महती सांगणारा आपला देश जगातील सर्वांत जास्त अंधांचा देश म्हणून ओळखला जातोय. दरवर्षी सुमारे तीन लाख अंधांची भर पडते. नेत्रदानात प्रतीक्षायादी वाढते. एम्समध्ये कार्यरत आर. पी. सेंटर ऑफ ऑफ्थॅल्मिक संघटनेच्या पुढाकाराने देशभरात नेत्रदानाचे नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न २०१७ मध्ये झाला होता. नॅशनल कॉर्निअल ग्रीड तयार करण्याचे संकेत मिळाले. ग्रीड तयार झाले असले तर देशातील अडीचेशेवर नेत्रपेढ्या एका छताखाली येणार होत्या. बायोमेट्रिक पद्धतीतून देशात एकच प्रतीक्षायादी तयार झाली असती. एका क्लिकवर नेत्रपेढ्यांमध्ये प्रतीक्षायादीत बुबुळाच्या प्रतीक्षेतील दृष्टीहीन व्यक्तीला लवकर लाभ मिळाला असता. परंतु, या ग्रीडला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. 

हेही वाचा - गाढ झोपेत असताना आला मोठा आवाज, घराबाहेर धाव घेताच दिसलं थरारक दृश्य

नॅशनल कॉर्निअल ग्रीड तयार करण्याची संकल्पना पुढे आली होती. मात्र, अद्याप या संकल्पनेला मूर्त रूप आले नाही. शासकीय पातळीवर हे ग्रीड तयार झाल्यास राष्ट्रीय अंधत्व निवारणाच्या कार्याला गती येईल. यामुळे कोणत्या नेत्रपेढीत किती बुबुळे उपलब्ध आहेत, प्रतीक्षा यादी किती लोकांची आहे, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. 
देशातील अडीचशेवर नेत्रपेढ्यांपैकी २५ नेत्रपेढ्याच पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. ग्रीड तयार झाल्यास ज्या नेत्रपेढ्या चांगले काम करतात त्यांनाच ठेवून शासकीय व खासगी हॉस्पिटल जोडून अंधत्व निवारणाचे लक्ष्य साध्य करता येईल. 
-डॉ. अशोक मदान, विभागप्रमुख, नेत्ररोग विभाग, मेडिकल.
 

loading image
go to top