fast track court
sakal
नवी दिल्ली, ता. २ : पेपरफुटीच्या प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालये स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात केली होती. मात्र, या घोषणेनंतर काहीच दिवसांत दिल्लीतील ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश अनु ग्रोव्हर बलिगा यांची तडकाफडकी बदली केली आहे. बदलीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या बदलीमुळे पुन्हा एकदा नीट पेपरफुटी प्रकरण आणि फास्ट ट्रॅक कोर्टाची चर्चा सुरू झालीय.