NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

NEET Protest Delhi लोकसभेत केंद्रीय मंत्री किरेण रिजिजू यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावर चर्चेला सरकार तयार असल्याचं सांगण्यात आलंय. तर दुसरीकडे दिल्लीतील मेट्रो स्थानकं बंद करण्यात आली आहेत.
Government Ready for NEET Talks, Metro Stations Shut

Government Ready for NEET Talks, Metro Stations Shut

Esakal

Updated on

दिल्लीत नीट पेपर फुटी प्रकरणी सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्यावर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसकडूनही आंदोलन सुरू करण्यात आलंय. संसदेचं पावसाळी अधिवेशन असताना होत असलेल्या या आंदोलनामुळे दिल्लीतलं वातावऱण तापलं आहे. आंदोलनासाठी देशभरातून विद्यार्थी आणि कार्यकर्ते दाखल झाले आहेत. लोकसभेत केंद्रीय मंत्री किरेण रिजिजू यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावर चर्चेला सरकार तयार असल्याचं सांगण्यात आलंय. तर दुसरीकडे दिल्लीतील मेट्रो स्थानकं बंद करण्यात आली आहेत. यामुळे केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनाकडून कशाची तयारी केली जातेय असा प्रश्न आता आंदोलकांकडून विचारला जात आहे. Delhi Metro Closes 15 Stations During Protest

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com