Government Plans Major NTA Reforms
esakal
नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. याची दखल घेत केंद्र सरकार आता आक्रमक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने नव्या कायद्याला मंजुरी दिली असून, याच पार्श्वभूमीवर आज रात्री शिक्षण मंत्रालयाकडून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.