NEET 2020 Result : पुन्हा होणार परीक्षा; निकाल पुढे ढकलला!

वृत्तसंस्था
Monday, 12 October 2020

देशभरातील ३८४३ परीक्षा केंद्रांवर १३ सप्टेंबरला नीटची परीक्षा घेण्यात आली होती. अधिकृत माहितीनुसार, यंदा जवळपास ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

NEET 2020 : नवी दिल्ली : यंदा नीटची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालासाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. आज नीट परीक्षेचा निकाल जाहीर होणार होता. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, आता नीट परीक्षेचा निकाल १६ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याबाबतची माहिती सुप्रीम कोर्टला दिली आहे. 

'पार्ले जी' कंपनीचा जाहिरातींबाबत मोठा निर्णय; सोशल मीडियावर प्रचंड कौतुक

दरम्यान, कोरोनामुळे जे विद्यार्थी नीट परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी नीटची परीक्षा पुन्हा घेण्यास सुप्रीम कोर्टने हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे राहिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा १४ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. 

१३ सप्टेंबरला झाली होती परीक्षा
देशभरातील ३८४३ परीक्षा केंद्रांवर १३ सप्टेंबरला नीटची परीक्षा घेण्यात आली होती. अधिकृत माहितीनुसार, यंदा जवळपास ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले होते. एकूण १५.९७ लाख उमेदवारांनी नीट परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 

आणखी वाचा - कंगनाचे पुन्हा ट्विट, खंडीत वीज पुरवठ्यावर खोचक टिप्पणी

नीट २०२० च्या परीक्षेचा निकाल उमेदवारांनी पुढीलप्रमाणे तपासावा:  
- पहिल्यांदा अधिकृत वेबसाइट ntaneet.nic.in वर जा.
- यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर, नीट अर्ज क्रमांक, जन्म तारीख आणि सिक्योरिटी पिन सबमिट करा.
- नीट २०२० चा निकाल आपल्या स्क्रीनवर उघडेल.
- आता तुम्ही तुमचा निकाल डाउनलोड करू शकता.

नीट निकालानंतर समुपदेशन होणार सुरू 
१६ ऑक्टोबरला नीट २०२० चा निकाल लागल्यानंतर एमबीबीएस आणि बीडीएस पदवीला प्रवेश घेण्यासाठी वैद्यकीय समुपदेशन समिती (एमसीसी) च्या वतीने आरोग्य विज्ञान महानिदेशालय (डीजीएचएस) आणि अखिल भारतीय कोटा (एआयक्यू) नीट समुपदेशन २०२० ची सुरवात करेल. एआयक्यू अंतर्गत प्रवेश घेणारे उमेदवार संबंधित अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NEET result 2020 to be declared on October 16