नेटफ्लिक्स आठवडाभरासाठी मोफत 

netflix
netflix

नवी दिल्ली - देशभरातील सर्वच नागरिकांना आठवडाभरासाठी मोफत सेवा देण्याचा ओटीटी फ्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सचा विचार आहे. नेटफ्लिक्सच्या या नव्या पॅकेजची भारतातून सुरवात होणार आहे.

कंपनीने जगभरात आपला विस्तार करण्याचे नियोजन आखले असून भारतीयांना मिळणारे हे फ्री पॅकेज देखील त्याचाच भाग असल्याचे बोलले जाते. याबाबत बोलताना नेटफ्लिक्सचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर ग्रेग पीटर्स यांनी सांगितले, की आमच्या कंपनीने या आधीच तीस दिवसांच्या फ्री ट्रायलची ऑफर दिली आहे, यामध्ये यूजर्संना आमच्या काही मोजक्या वेब सीरीजचा आनंद घेता येत होता.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कंपनीचा अमेरिकेमधील फ्री ट्रायल प्लॅन संपुष्टात आला असून भारताची दारे मात्र त्याच्यासाठी उघडी आहेत. नव्या प्रेक्षकांना वेब स्ट्रीमिंगकडे आकर्षित करण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com