शंभर दिवसात Netflixनी दोन लाख मेंबर्स गमावले, कंपनीने दिले स्पष्टीकरण |Netflix Latest News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Netflix News | Netflix lost Subscribers

शंभर दिवसात Netflixनी दोन लाख मेंबर्स गमावले, कंपनीने दिले स्पष्टीकरण

नेटफ्लिक्सने 100 दिवसांमध्ये दोन लाख सदस्य गमावले असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे उघड केले होते. याच दरम्यान मंगळवारी पुन्हा एकदा नेटफ्लिक्सच्या ग्राहकांमध्ये घसरण नोंदवली. या पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्स मोठ्या प्रमाणात तोट्यात आहे.

हेही वाचा: IAS टीना डाबीचा आज विवाह! मराठमोळ्या डॉ. प्रदीप गावंडेसोबत सात फेरे

नेटफ्लिक्स पत्राद्वारे म्हटले आहे की आम्ही पाहिजे तितक्या वेगाने महसूल वाढवत नाही आहोत. नेटफ्लिक्सच्या मते,अनेक कारणांमुळे त्यांचे ग्राहक कमी झाले आहेत.घरांमध्ये परवडणाऱ्या ब्रॉडबँड इंटरनेट सेवा, स्मार्ट टीव्ही नसणे.सदस्य त्यांची खाती अशा लोकांशी शेअर करतात जे त्यांच्या घरात राहत नाहीत त्यामुळए त्यांचे सदस्य कमी होत असल्याचा दावा नेटफ्लिक्सनी केलाय.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सचे या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात 221.6 मिलियन ग्राहक कमी झाले. जे गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीपेक्षा किंचित कमी आहे. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत कंपनीने $1.6 अब्ज निव्वळ उत्पन्न नोंदवले तर एका वर्षापूर्वी याच कालावधीत उत्पन्न $१.७ अब्ज होते. कमाईचे आकडे जाहीर झाल्यानंतर नेटफ्लिक्सचे शेअर्स 25 टक्क्यांनी घसरून $262 वर आले आहेत.

हेही वाचा: गुळाला हवी आता महाराष्ट्राची साथ! उत्पादन, प्रक्रिया व विक्रीच्या प्रचंड संधी

सुमारे 222 मिलियन कुटुंबे नेटफ्लिक्स सेवेसाठी पैसे देत असून 100 मिलियनहून अधिक कुटुंबांसह ती आपली खाती शेअर करतात, असा दावा नेटफ्लिक्सनी केलाय सोबतच युक्रेन रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियामधील सेवा निलंबित केल्यामुळे नेटफ्लिक्सच्या ग्राहकांमध्ये घट झाल्याचे कारणही नेटफ्लिक्सनी दिले.

Web Title: Netflix Told Reasons Why Netflix Lost Its Subscribers Within 100 Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top