देशभरातील नेटीझन्सना ऑनलाइन वीस कोटी रुपयांना चुना

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या बनावट भारतीय चलन समन्वय केंद्राने देशभरातील ऑनलाइन गैरव्यवहाराचे एक मोठे रॅकेट उघड केले.
Cyber Crime
Cyber CrimeSakal

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाच्या बनावट भारतीय चलन समन्वय केंद्राने देशभरातील ऑनलाइन गैरव्यवहाराचे (Online Scam) एक मोठे रॅकेट (Racket) उघड केले असून यामाध्यमातून देशभरातील नेटीझन्सना (Netizens) वीस कोटी रुपयांना चुना (Loot) लावण्यात आल्याचे उघड झाले आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आठजणांना ताब्यात घेतले असून त्यांनी आठशेजणांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमध्ये (Crime) गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबरच अनेक राज्यांचे पोलिस देखील सहभागी झाले होते. (Netizens Across the Country Chose Rs 20 Crore Online Fraud)

आतापर्यंत विविध राज्यांमधून आठजणांना अटक करण्यात आली असून आणखी शेकडोजण पोलिस यंत्रणेच्या रडारवर आहेत. पोलिसांनी विविध ठिकाणांवरून शेकडो स्मार्टफोन ताब्यात घेतले असून यामाध्यमातून लोकांना गंडा घालण्यात आल्याचे उघड झाले आहे. या गैरव्यवहाराची व्याप्ती अठरा राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये असल्याचे उघड झाले आहे. हे रॅकेट चालविणाऱ्या मंडळींनी मागील ६ ते १२ महिन्यांमध्ये ८०० लोकांना तब्बल वीस कोटी रुपयांना गंडा घातल्याचे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याच रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आणखी तीनशे लोकांची ओळख पटली असून त्यांना देखील लवकरच अटक होऊ शकते.

Cyber Crime
डेल्टा प्लस व्हेरियंटची चिंता नको; सरकारचं स्पष्टीकरण

हे आहेत सूत्रधार

मध्यप्रदेशातील बालाघाट येथील हुकूमसिंग बिसेन आणि झारखंडच्या देवगडमधील संजय महातो हे या गैरव्यवहाराचे सूत्रधार असल्याचे बोलले जाते. बिसेन हा सध्या सनदी सेवेच्या परीक्षेची तयारी करतो त्याने रेल्वे खात्यामध्ये अभियंता म्हणून देखील काम केले आहे. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशातून दोघांना तर झारखंडमधून चौघांना अटक करण्यात आली आहे.

म्हणून गैरव्यवहार कळला

११ जून रोजी हा गैरव्यवहार उघड झाला होता. उदयपूरमधील एका ८७ वर्षांच्या नागरिकाने ‘एफसीओआरडी’कडून चालविण्यात येणाऱ्या ‘सायबरसेफ’ या ॲपच्या माध्यमातून ६.५ लाख रुपये गमावले असल्याची तक्रार केली होती. हे ॲप २०१९ मध्ये लाँच करण्यात आले होते. ते तांत्रिक वित्तीय सेवा देणाऱ्या १८ कंपन्यांशी संबंधित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com