'कोरोना रुग्णांसह कुटुंंबियांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात रहावं'

'कोरोना रुग्णांसह कुटुंंबियांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात रहावं'

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट थैमान माजवत आहे. मात्र, आता ही दुसरी लाट ओसरू लागल्याचं चित्र आहे. दिलासा देणारी बाब अशी आहे की, सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. या दरम्यानच आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या उपचारांसाठी संशोधन केलेल्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये, कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, आयवरमेक्टीन, डॉक्सीसायक्लीन सहित इतर अनेक औषधांच्या वापरावर बंदी आणली आहे. याआधी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सर्रासपणे ही औषधे वापरली जात होती. (New Corona Guidelines Revised Health Ministry Guidelines Drop Ivermectin Doxycycline From Covid Treatment Coronavirus)

नव्या गाईडलाईन्समध्ये कोरोना रुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना एकमेकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्कात राहण्याचा आणि सकारात्मक बोलण्याचा सल्ला दिला गेला आहे. सोबतच असं आवाहन देखील करण्यात आलंय की, कसल्याही प्रकारची अडचण अथवा त्रास जाणवू लागल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतरच औषधे घ्यावीत.

'कोरोना रुग्णांसह कुटुंंबियांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात रहावं'
सेंट्रल विस्टा प्रकल्पाबाबतचे 'भ्रम आणि वास्तव'; मोदी सरकारने दिली सविस्तर माहिती

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या गाईडलाईन्सनुसार, ज्या रुग्णांमध्ये कोरोना संक्रमणाची लक्षणे दिसत नाहीयेत अथवा अत्यंत सौम्य लक्षणे आहेत, त्यांना कसल्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाहीये. मात्र, दुसऱ्या व्याधींबाबत जी औषधे सुरु आहेत, ती मात्र सुरुच ठेवायला हवीत. अशा रुग्णांनी टेली कन्सल्टेशन (व्हिडीओच्या माध्यमांतून उपचार) घेतलं पाहिजे. योग्य प्रकारे आहार घेतला पाहिजे. सोबतच मास्क, सोशल डिस्टन्सिंगसारख्या कोरोना नियमांचं पालन करणं आवश्यक राहिलंच.

आता 'ही' औषधे घेण्याची गरज नाही

डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हीसेस (DGHS) ने नव्या गाईडलाईन्स अंतर्गत लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या उपचारांमध्ये वापर केल्या जाणाऱ्या काही औषधांना आता यादीतून काढून टाकलं आहे. गाईडलाईन्समध्ये असं सांगण्यात आलंय की, अशा रुग्णांना दुसरी टेस्ट करणं देखील गरजेचं नाहीये. याआधी 27 मे रोजी गाईडलाईन्स जारी केल्या गेल्या होत्या. ज्यामध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, आयवरमेक्टीन, डॉक्सीसायक्लीन, झिंक आणि मल्टीविटामिनच्या वापरास बंदी घातली होती. याशिवाय लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी सीटी स्कॅनसारख्या अनावश्यक टेस्टची देखील गरज नसल्याचं म्हटलं होतं.

'कोरोना रुग्णांसह कुटुंंबियांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात रहावं'
पवार साहेब आमचे मार्गदर्शक - बाळासाहेब थोरात

आज सोमवारी कोरोनाचे नवे 1 लाख 1 हजार 159 रुग्ण सापडले आहेत. हा आकडा गेल्या 62 दिवसांपासूनचा सर्वांत कमी आकडा आहे, याआधी 5 एप्रिल रोजी 96,563 नवे रुग्ण सापडले होते. गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमणामुळे 2,444 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com