bhagat singh koshyari and sudhanshu trivedi
bhagat singh koshyari and sudhanshu trivedisakal

BJP Politics : कोशियारी-त्रिवेदींच्या वक्तव्यांनंतर भाजपचे ‘डॅमेज कंट्रोल'

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर भाजपने ‘डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न सुरू केले आहेत.
Summary

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर भाजपने ‘डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न सुरू केले आहेत.

नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराजांबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ‘डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न सुरू केले आहेत. कोशियारी यांनी ज्यांची तुलना थेट शिवरायांशी केली ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या वक्तव्यापासून फटकून राहण्याची भूमिका घेताना, ‘शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत' असे स्पष्ट सांगितले आहे. दरम्यान गुजरात निवडणुकीनंतर कोशियारी यांच्याबाबत काही निर्णय दिल्लीतून होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान शिवरायांबद्दल भाजप नेत्यांची जीभ घसरण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या एका उत्तर भारतीय नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आजचे शिवाजी महाराज आहेत, असा आचरट दावा करणारी पुस्तिकाच प्रकाशित केली होती. त्या पुस्तिकेच्या प्रकाशनाला भाजपचे दिल्लीतील काही मराठी नेतेही हजर होते. ताज्या वादात त्रीवेदी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या वृत्तवाचिकेशी बोलताना सावरकरांबाबतच्या वादातील चर्चेत शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

मात्र कोशियारींच्या वक्तव्याने वाद उफाळून जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही गटात नाराजी पसरल्याचे समोर आले तेव्हा त्रीवेदी यांच्याशी भाजपच्या ‘वरिष्ठ पातळी‘वरून संपर्क साधण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोशियारी यांच्याकडे दिल्लीतून अशी विचारणा झाली की नाही हे समजू शकले नाही. मात्र गुजरात निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजभवनाबाबत काही हालचाली होऊ सकतात असे भाजप वर्तुळातून सांगितले जाते. यापूर्वी निलंबित भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल गरळ ओकली त्या प्रकरणानंतर भाजपच्या सर्व प्रवक्त्यांना कोणत्याही धर्मातील दैवते, प्रेषित यांच्याबरोबरच देशातील कोणत्याही महापुरूषाबद्दल वादग्रस्त विधाने करू नका, अशी तंबी देण्यात आली होती.

कोशियारी यांनी दोन दिवसांपूर्वी गडकरी यांची तुलनाछत्रपती शिवरायांबरोबर केल्यावर त्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.

या पार्श्वभूमीवर गडकरी म्हणाले, 'शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. आई-वडिलांपेक्षा आपली शिवाजी महाराजांवर अधिक निष्ठा आहे. त्यांचे जीवन आमच्यासाठी आदर्श आहे. तो एक यशस्वी, प्रसिद्ध, सक्षम सार्वजनिक राजा होता. ते निश्चयाचा महामेरू, अभंग श्रीमंत योगी होते. डी.एड, बी.एड करणारा ते राजे नव्हते. ते पुढे म्हणाले, ‘ही तुमच्या मुलांची वेळ आहे. कठोर शिक्षण घेतल्यावरच कोणीही राजा होतो.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com