IRCTCचे नवीन वेबसाईड अनावरण, तिकीट आरक्षित करणे आणखीन सोपे

IRCTCचे नवीन वेबसाईड अनावरण, तिकीट आरक्षित करणे आणखीन सोपे

मुंबई: नव्या वर्षात प्रवाशांना तिकीट काढणे, तिकीट आरक्षित करणे अत्यंत सोयीस्कर आणि सोपे झाले आहे. नव्या वर्षात आयआरसीटीसीची वेबसाईट अपग्रेट झाले आहे. या वेबसाईटवर नवे फिचर्स अनुभवता येणार आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते गुरुवारी वेबसाइटचे अनावरण करण्यात आले. 

नवीन वेबसाइटमध्ये जास्त युजर फ्रेंडली फिचर्स असणार आहेत. अनेक बदलांनंतर आरक्षण करणे वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नव्या वेबसाईटमध्ये सायबर सुरक्षाला प्राधान्य देण्यात आले आहे. कोणत्याही सायबर फसवणुकीला बळी न पडता वेबसाईटवर सहजपणे तिकीट आरक्षित करता येणार आहे. या नव्या वेबसाइटवर मिनिटाला 10 हजारापेक्षा जास्त तिकिट्स आरक्षित होतील, सध्या यावर 7 हजार 500 तिकिट्स मिनिटाला आरक्षित होत आहेत.

आयआरसीटीसीने एक नवीन पोस्ट पेड पर्याय देखील सुरू केला आहे. या सुविधेअंतर्गत वेबसाइटवर आधी तिकिट बुक करून नंतर पेमेंट करण्याचा पर्याय आहे. यामध्ये प्रवासी तिकिट बुक केल्यानंतर इ-पेमेंटच्या माध्यमातून 15 दिवसांच्या आतमध्ये कधीही पेमेंट करू शकतात. तिकिट डिलिव्हरीच्या 24 तासांच्या आतमध्ये पेमेंट करता येते.

  • परतावा संबंधित माहिती मिळेल. 
  • प्रवास आणि स्टेशन बाबत चांगल्या सूचना मिळतील. 
  • वन स्टॉप ट्रेन सिलेक्शन फीचरमध्ये बदल होतील. 
  • सर्व ट्रेन संबंधित सविस्तर माहिती  मिळू शकणार आहे.
  • ट्रेन तिकीट बुक करताना खाद्य पदार्थांचे आरक्षण करता येणार आहे.
  • ट्रेन तिकीट बुकिंग केल्यानंतर बाजूला पेमेंटचा पर्याय राहील, जेणेकरुन तिकीट आरक्षित करताना कोणतीही चूक होणार नाही.
  • प्रवासी, हॉटेल बुकिंग, खाद्य पदार्थांच्या आरक्षणाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. 
  • वेबसाईट हँग होण्याची समस्या राहणार नाही.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

New IRCTC upgraded website Piyush Goyal launched

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com