मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघातात आणि मृत्यूंमध्ये 40 टक्क्यांनी घट

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघातात आणि मृत्यूंमध्ये 40 टक्क्यांनी घट

मुंबईः मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी महामार्ग पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. 2020 या वर्षामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरील पळस्पे केंद्राच्या हद्दीतील अपघातात आणि त्यातील मृतांमध्ये 40 टक्क्यांनी घट झाल्याचे आढळुन आले आहे.   

राज्यातील महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक भुषणकुमार उपाध्याय यांनी वाहन चालकांचे प्रबोधन करण्याचे तसेच बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देखील उपाध्याय यांनी महामार्ग पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार महामार्ग पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक सुदाम पाचोरकर,पळस्पे पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी आणि त्यांच्या पथकाने मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाईला सुरुवात केली.  

या मोहिमेअंतर्गत 2020 मध्ये इंटरसेफ्टर वाहनाद्वारे आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या 41 हजार 738 वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे सीट बेल्ट न लावणारे, वाहन वालवताना मोबाईलवर संभाषण करणारे, लेन कटींग करणारे, काळ्या काचा लावणारे, रिफ्लेक्टर नसलेले तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघन करणारे अशा 64 हजार 286 वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली. महामार्ग पळस्पे केंद्राकडून 2020 मध्ये एकूण 1 लाख 6026 वाहन चालकांवर चलनाद्वारे कारवाई करण्यात आली आहे.  

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर महामार्ग पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यात आल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावरील पळस्पे केंद्राच्या हद्दीत प्राणांतीक अपघातामध्ये 2019 च्या तुलने 2020 मध्ये 40 टक्के घट झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर पळस्पे केंद्राच्या हद्दीत 2019 मध्ये 23 अपघाताच्या घटना घडल्या असून त्यात 29 जणांचा बळी गेला होता. मात्र महामार्ग पोलिसांनी विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहन चालकांवर जोरदार कारवाईला सुरुवात केल्यानंतर 2020 या वर्षामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर पळस्पे हद्दीत फक्त 14 अपघात घडले आहेत. तसेच त्यात फक्त 15 लोकांचा मृत्यू झाल्याचे आढळुन आले आहे.  

मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर अपघातांचे आणि अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेच्या माध्यमातून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या आणि लेन कटींग करणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. त्याप्रमाणे त्यांचे प्रबोधन देखील करण्यात येत आहे. ही कारवाई यापुढील काळात देखील सुरु रहाणार आहे. 
डॉ.भुषणकुमार उपाध्याय-अपर पोलिस महासंचालक (वाहतुक) महाराष्ट्र राज्य

मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधन देखील करण्यात येत आहे. त्यामुळे वाहन चालकांमध्ये काही वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती होत आहे. त्याशिवाय महामार्गावर मोठ्या प्रमाणात गस्त वाढविण्यात आली असून अपघाताच्या ठिकाणी तात्काळ मदत पोहचविली जात आहे.
संजय बारकुंड-पोलिस अधीक्षक (महामार्ग पोलिस रायगड परिक्षेत्र) 
---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

40 Percent reduction accidents and deaths on Mumbai Pune Express

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com