नव्या संसदेचे भारतीय पद्धतीने सुशोभिकरण; अशी असणार आहे आपली नवी संसद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

या संसदभवनाचे बांधकाम येत्या 2022 पर्यंत पूर्ण होईल, असं म्हटलं जात आहे.

भारताची नवी संसद बांधण्यात येणार आहे. नव्या संसदभवनाबाबत चर्चा झाल्या असून सध्या त्याबाबतचे सगळे मार्ग मोकळे झाले आहेत. नवी प्रस्तावित संसदभवन ही जुन्या संसदेपेक्षा अधिक प्रशस्त आणि अधिक सोयीसुविधांनी समृद्ध असणार आहे. या संसदभवनाचे बांधकाम येत्या 2022 पर्यंत पूर्ण होईल, असं म्हटलं जात आहे. या संसदभवनाची एकूण रचना आणि आराखडा हा भारतीय धाटणीचा असणार आहे. यामध्ये संसद भवनाच्या सजावटीसाठी भारताचा राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराची आणि राष्ट्रीय फूल असणाऱ्या कमळाच्या प्रतिमा वापरण्यात येणार आहेत. या प्रतिमा आणि भितीचित्रांमुळे नवी संसद अधिक उठावदार आणि आकर्षक असणार आहे. या नव्या इमारतीच्या परिसरात वडाचीही अनेक झाडे लावण्यात येणार आहेत. वड हे राष्ट्रीय वृक्ष म्हणून ओळखला जातो. 

हेही वाचा - Bihar Election - मुख्यमंत्री कोण? NDA च्या बैठकीत झाला निर्णय; राज्यपालांकडे करणार दावा

नव्या इमारतीचे भारतीय सुशोभिकरण
संसदेची जुनी इमारत ही 1927 मध्ये बांधण्यात आली आहे. ही इमारत 144 खांबावर उभी आहे. सध्या जी संसदेची इमारत आहे त्याच्या बरोबर समोर उजव्या बाजूलाच ही नवी इमारत साकारण्यात येणार आहे. याबाबतची अधिक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, नव्या इमारतीमध्ये अनेक वस्तूंनी सुशोभिकरण करण्यात येणार आहे. कमळाच्या संकल्पनेवर आधारित ही भित्तीचित्र असणार आहेत. तर दुसऱ्या एका सभागृहात मोराच्या संकल्पनेवरील भित्तीचित्रे असणार आहेत. या नव्या इमारतीत अनेक सामाजिक उपक्रमांसाठी मध्यवर्ती लाँन्ज उपलब्ध असणार आहे. सेंट्रल हॉल नसणार आहे. 

नवी इमारत सोयीसुविधांनी युक्त
सेंट्रल विस्टा या प्रकल्पाचा भाग ही नवी संसद असणार आहे. मोदी सरकारने नव्या संसदभवनाच्या उभारणीसाठी तयारी केली आहे. या नव्या संसदेत वेगवेगळ्या भागांच्या नव्या इमारती, सरकारी कार्यालये असणार आहेत. तसेच पंतप्रधान आणि उपराष्ट्रपाती यांच्यासाठी निवासस्थानाचीही सुविधा करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - देशात शुक्रवारी 44,879 नवे रुग्ण; 24 तासांत 547 कोरोना रुग्णांचा मृत्यू

नव्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टसाठी 20 हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. यामधील 861 कोटी रुपये खर्च हा संसद भवनाच्या उभारणीसाठी करण्यात येणार आहे. संसद भवनात सर्व मंत्र्यांसाठी एकूण 90 कार्यालये असणार आहेत. यामध्ये त्यांच्यासाठी अनेक सोयीसुविधा असतील. त्यांच्या राहण्या-खाण्यासाठी विशेष सुविधा असेल. तसेच भव्य डायनिंग हॉलही असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

बांधकामाआधी काही बदल
नवी संसद प्रत्यक्षात येण्याआधी काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा हा तात्पुरता हलवण्यात येणार आहे. तसेच मोतीलाल नेहरु आणि देवीलाल यांचेही पुतळे तात्पुरते हलवण्यात येणार आहे. बांधकाम करताना सोयीसाठी हे बदल असणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new parliament building will be based on indian touch know how it will be