भारत-चीनदरम्यान 'राईस वॉर'; आफ्रिकेतील वर्चस्वाला धक्का!

वृत्तसंस्था
रविवार, 5 जानेवारी 2020

सरकारी मालकीच्या गोदामांमधून चीनने मागील सहा महिन्यांत 30 दशलक्ष टन एवढ्या मोठ्या प्रमाणात पांढरा तांदूळ निर्यातीसाठी बाहेर काढला आहे.

नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता निर्यातदार झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताला नवा स्पर्धक निर्माण झाला आहे. जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार देश असा बहुमान मिरविणाऱ्या भारतासमोर सध्या चीनने मोठे आव्हान निर्माण केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आफ्रिकेतील तांदळाच्या बाजारपेठेतील भारताचा दबदबा मोडून काढत चीनने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील 'उद्योग भवना'तील धोरणकर्त्यांपासून ते तांदळाची निर्यात करणाऱ्या बड्या मिल मालकांपर्यंत सर्वांचेच धाबे दणाणले आहे.

- पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील सत्यता समोर; लाखो कनेक्शन...

चीनकडून आतापर्यंत तांदळाची मोठ्या प्रमाणात आयात केली जात होती. मात्र चीनने आपल्याकडील पांढऱ्या तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा पहिला फटका भारताला बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील निर्यात विभागातील (कृषी) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

- ममता मोदींना म्हणतात की, 'तुम्ही भारताचे अँम्बेसिडर की...'

सरकारी मालकीच्या गोदामांमधून चीनने मागील सहा महिन्यांत 30 दशलक्ष टन एवढ्या मोठ्या प्रमाणात पांढरा तांदूळ निर्यातीसाठी बाहेर काढला आहे. या तांदळाची मुख्यत्वे आफ्रिकेतील देशांना निर्यात केली जाणार आहे. 
साधारणपणे 400 डॉलर प्रतिटन दराने भारत बिगर-बासमती तांदळाची निर्यात करतो.

मात्र यापेक्षा कमी दराने चीनकडून तांदळाची निर्यात केली जात आहे, अशी माहिती उत्तराखंडातील मोठे तांदूळ निर्यातदार असलेल्या लक्ष्य अगरवाल यांनी दिली. चीनकडून निर्यात होणाऱ्या बिगर-बासमती तांदळाचा दर 300 ते 320 डॉलर प्रतिटन आहे, असे बाजारपेठेतील सूत्रांनी सांगितले.

- पेट्रोल पंप चालकाने मागितली उधारी अन् मंत्र्यांवर आली 'ही' वेळ

तांदळाचे सर्वांत मोठे निर्यातदार 

1) भारत 
2) थायलंड 
3) व्हिएतनाम 
4) पाकिस्तान

भारताची निर्यात (रुपयांत) 

2018 : 14,059.51 कोटी 
2019 : 9,028.34 कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The New Rice War between India and China on big African markets