

Bihar Infrastructure Shock As 13 Crore Ropeway Falls During Trial Phase
Esakal
तब्बल १३ कोटी रुपये खर्चून ६ वर्षात उभारलेला रोपवे ट्रायल सुरू असतानाच कोसळल्याची घटना घडली आहे. बिहारच्या रोहतास इथं घडलेल्या या घटनेमुळं पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मुद्दा चर्चेत आला आहे. सुदैवानं ट्रायल वेळी घडलेल्या या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पण दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. या प्रोजेक्टचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यामुळे धक्का बसलाय.