Live शोमध्ये न्युज अँकरनी गिळली चक्क माशी, पहा Video

या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की न्युज अँकरनी लाईव्ह शो मध्ये चक्क माशी गिळली.
video
videosakal

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थरकाप उ़डविणारे असतात. काही अंगावर काटा आणणारे असतात तर काही आश्चर्यकारक करणारे असतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की न्युज अँकरनी लाईव्ह शो मध्ये चक्क माशी गिळली.

video
Viral Video : 'कच्चा बादाम' नंतर सोशल मीडियावर 'भोपाळी नमकीन'ची धूम

सदर व्हिडिओत न्युज अँकर लाईव्ह शोमध्ये बातम्या देत होती. अचानक तीच्या समोर माशी येते आणि तीला ती माशी दिसताच ती घाबरते आण मग काय माशी एवढी तोंडाजवळ येते की नाईलाजाने ती माशी गिळते. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहे.

video
Video: ...अन् बघता बघता 50 फुटावरून पाळणा पडला; थरकाप उडवणारी घटना

फराह नासर असे या न्युज अँकरचे नाव असून ती कॅनडाच्या ग्लोबल न्यूज चॅनलमध्ये अँकर आहे. तीने स्वत: ट्वीट करत आपण माशी गिळल्याचे सांगितले. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com