Nirbhaya Case : फाशीपूर्वी तिहारमध्ये झालं असं काही...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 मार्च 2020

- चारही दोषींना काळे कपडे घालण्यात आले

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या नवी दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना अखेर फाशी देण्यात आली. याप्रकरणात एकूण सहा आरोपी दोषी ठरले होते. त्यातील एक अल्पवयीन होता. त्यामुळं त्याला सुधारगृहात ठेवून शिक्षा पूर्ण करावी लागली, तर प्रकरणातील मुख्य आरोपीने तिहार कारागृहात आत्महत्या केली होती.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

उर्वरीत चार आरोपींना आज पहाटे साडेपाच वाजता तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आलं. गेल्या दोन महिन्यांत चारही आरोपींनी फाशी टाळण्यासाठी कायद्याच्या सर्व मार्गांचा अवलंब केला. परंतु, अखेर पीडित तरुणीला आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर न्याय मिळाला. 

'निर्भया'ला मिळाला न्याय; जाणून घ्या आठ वर्षांत कधी काय घडलं!

फाशीपूर्वी तिहार तुरुंगातील घटनाक्रम

पहाटे सव्वातीन वाजता या चौघांनाही उठवण्यात आले. मात्र, त्यांच्यातील कोणीही झोपलं नव्हतं. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना आंघोळ करण्यास सांगण्यात आले. नंतर, चहा मागवण्यात आला आणि अखेरची इच्छा विचारली.

पांढरे कपडे घालण्यात आले

या चारही दोषींना सेलच्या बाहेर आणण्यापूर्वी पांढरे कपडे घालण्यात आले. चौघांचे हात मागे बांधण्यात आले होते. मात्र, यावेळी दोघा दोषींनी हात बांधण्यास विरोध करण्याचाही प्रयत्न केला.

दिल्लीतील आरोपींच्या फाशीबद्दल समाधान; आता कोपर्डीच्या ताईला न्याय कधी?

पूजाही केली गेली 

या चारही दोषींना त्यांची शेवटी इच्छा विचारण्यात आली. त्यानंतर त्यांनी पूजा करायची आहे, असे सांगितले. तुरुंग प्रशासनाने पूजेसाठी पंडितची व्यवस्था केली. त्यांना नाष्टा करण्यास सांगण्यात आले. 

चारही दोषींना काळे कपडे घालण्यात आले

पश्चिम दिल्लीच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटही तुरुंगात पोहोचले होते. या चारही दोषींची शेवटची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर डॉक्टरांनी चारही दोषींची वैद्यकीय चाचणी घेतली. त्यानंतर जल्लाद आणि तुरुंग अधिकारी दोषींच्या खोलीत गेले. त्यांना काळे कपडे घालण्यात आले. तसेच मागून त्यांचे हातही बांधण्यात आले. 

ब्रेकिंग : निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी, अण्णा १० वाजता सोडणार मौन

इशारा मिळाला अन्...

फाशी घरात घेऊन जात असताना एक दोषी प्रचंड घाबरला आणि तिथेच लादीवर लोळला. त्याने पुढे जाण्यास नकार दिला. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर त्याला नेण्यात आले. त्यांचे चेहरे काळ्या कपड्याने झाकण्यात आले. थोड्यावेळात जेल प्रशासनाकडून इशारा मिळताच जल्लादने खटका खेचला आणि चारही दोषींना फाशी देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya Case Know more what happened in Tihar Jail Before Hanging