निर्भया बलात्कार प्रकरण : अक्षय सिंहला फाशीच; याचिका फेटाळली

वृत्तसंस्था
बुधवार, 18 डिसेंबर 2019

निर्भया प्रकरणातील इतर तीन आरोपी मुकेश, पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षीच फेटाळून लावल्या होत्या. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिला होता.

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अक्षयकुमार सिंह याची फेरविचार याचिका आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्याचा फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या याचिकेवरील सुनावणीतून सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी स्वतःहून माघार घेतली होती. त्यामुळे या फेरविचार याचिकेची सुनावणी आज दुसऱ्या योग्य खंडपीठापुढे झाली. या खंडपीठात न्या. आर. भानुमती यांच्या नेतृत्वाखालील न्या. अशोक भूषण आणि न्या. बोपन्ना या विशेष खंडपीठाने अक्षय सिंगची पुनर्विचार याचिका फेटाळली. 

नागरिकत्व कायद्याला स्थगिती नाही; केंद्रालाही नोटीस

निर्भया प्रकरणातील इतर तीन आरोपी मुकेश, पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षीच फेटाळून लावल्या होत्या. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये दिला होता. या निर्णयावर अक्षयकुमारने फेरविचार याचिका दाखल केली होती. आता चौथ्या दोषीचीही याचिका फेटाळण्यात आल्याने फाशीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. निर्भयावर बलात्कार करणाऱ्यांना या महिन्यातच शिक्षा देण्याची शक्यता आहे.

पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirbhaya case Supreme Court rejects convicts review plea