पीएम आवास योजनेतून देणार 80 लाख घरं! अर्थमंत्र्यांची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget 2022) जाहीर करताच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
Nirmala-Sitharaman
Nirmala-SitharamanTeam eSakal

Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget 2022) जाहीर करताच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. रोजगार, विशेष आर्थिक क्षेत्र, जीएसटी यावर काही अंशी दिलासादायक गोष्टींची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी ६० लाख जणांना रोजगाराची घोषणा करताना पुढील वर्षात 80 लाख घरं उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले आहे. त्यावर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. Nirmala sitharaman budget 2022 big things of finance pm home loan

देशाचं बजेट जाहिर करताना त्यात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक गोष्टींवर भर दिल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या बजेटमध्ये 1486 जे निरुपयोगी कायदे जे पंतप्रधान घरकुल आवास योजनेशी संबंधित आहेत ते काढून टाकण्याचा निर्णय सीतारामन यांनी घेतला आहे. सीतारामन यांनी आपला यावेळी चौथा अर्थसंकल्प जाहिर करताना वेगवेगळ्या गोष्टींवर भर दिला आहे.

Nirmala-Sitharaman
Union Budget 2022 : निवडणुका असलेल्या पाच राज्यांना काय मिळणार?

सीतारामन यांनी सांगितले की,

- आता 1486 जे निरुपयोगी कायदे आहेत त्यांचे उच्चाटन करण्यात येणार

- पीएमच्या योजनेला आणखी गती मिळावी यासाठी येत्या तीन वर्षात विशेष प्रयत्न करणार

- शेतकऱ्यांविषयी काही महत्वाच्या घोषणा बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत.

- गंगा किनारी 5 किमीच्या परिक्षेत्रात जैविक शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाणार

- पीएम घरकुल आवास योजनेअंतर्गत 80 लाख नवीन घरांची निर्मिती केली जाणार आहे.

अर्थमंत्र्यांचे भाषण सुरु होताच शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार झाल्याचे दिसून आले. बीएसईचा सेंसेक्स हा 800 अंकांनी वधारला. सध्या सेसेंक्स हा 825 वरुन 58 हजार 840 वर पोहचला आहे. निफ्टीमध्ये देखील वाढ झाली आहे. तो 17 हजार 563 वर गेला आहे.

Nirmala-Sitharaman
Union Budget 2022: शेअर मार्केटची सकारात्मक सुरूवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com