esakal | मोदी मंत्रिमंडळातील सर्वात तरुण चेहरा; वय फक्त 35
sakal

बोलून बातमी शोधा

Nisith Pramanik

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमडळाचा विस्तार बुधवारी पार पडला. यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर वादग्रस्त ठरलेल्या किंवा अकार्यक्षम असलेल्या अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे.

मोदी मंत्रिमंडळातील सर्वात तरुण चेहरा; वय फक्त 35

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमडळाचा विस्तार बुधवारी पार पडला. यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर वादग्रस्त ठरलेल्या किंवा अकार्यक्षम असलेल्या अनेक मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. मोदींचे नवे मंत्रिमंडळ तरुण असून सरासरी वय 58 आहे. अनेक तरुण नेते मोदींच्या मंत्रिमंडळात आहेत. निसिथ प्रमाणिक हे मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री आहेत. पश्चिम बंगालच्या कूच बिहारचे असलेले निसिथ यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. (Nisith Pramanik becomes youngest member of Team Modi at age 35)

निसिथ प्रमाणिक यांनी बुधवारी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे कूच बिराममधून प्रथमच केंद्रात मंत्री झाला आहे. प्रमाणिक यांच्याकडे बीसीएची पदवी आहे. त्यांनी सहाय्यक शिक्षक म्हणून प्राथमिक शाळेत काम केलं आहे. निसिथ प्रमाणिक पहिल्यांदाच 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आले आहेत. लोकसभेच्या तोंडावर त्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. बंगालमधील एकूण चार नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.

हेही वाचा: ‘टीम मोदी’चा महाविस्तार! पाहा संपूर्ण यादी

निसिथ प्रमाणिक यांनी पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि ते जिंकले होते. पण, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि संसद सदस्य म्हणून राहणं पसंद केलं. भाजपने पश्चिम बंगालच्या चार खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. पण, त्यांतील निसिथ प्रमाणिक आणि जगन्नाथ यांनी निवडणूक जिंकली होती. बाबुल सुप्रियो आणि लोकेट चॅटर्जी यांना पराभव स्वीकाराला लागला होता.

हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डझनभर मंत्र्यांना दिला नारळ

दरम्यान, केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा बुधवारी संध्याकाळी पहिलावहिला विस्तार झाला. यात ४३ मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १५ कॅबिनेट व २८ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड (औरंगाबाद) व डॉ. भारती पवार (दिंडोरी, नाशिक) या चार चेहऱ्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन हा विस्तार करण्यात आला आहे. त्याचबरोबर १३ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे

loading image