
Gadkari Defends Ethanol Blending Policy Amid Allegations
Esakal
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या सरकारच्या निर्णयावर सध्या टीका होत आहे. गडकरींनी मुलाच्या कंपनीसाठी हा निर्णय घेतल्याचा आरोपही करण्यात येतोय. आता या आरोपांवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिलीय. माझ्यावर करण्यात येणारे आरोप हे पूर्वग्रहदुषित आहेत. सगळं पेड कॅम्पेन असून राजकीयदृष्ट्या टार्गेट करण्यासाठीचं हे षडयंत्र असल्याचं गडकरी म्हणाले. एका कार्यक्रमात ते बोलत होते.