

Nitin gadkari approves road widening project
esakal
Union Minister Nitin Gadkari News : केंद्रीय नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र-कर्नाटक राज्यसीमेशी निगडीत एका मोठ्या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. यामुळे आंतरराज्यीय वाहतुकीस चालना मिळणार आहे. शिवाय यामुळे लातूर, उमरगा तसेच आंध्र प्रदेश येथील भाविकांना अक्कलकोट येथे येण्यासह सोयीचे होणार आहे.
नितीन गडकरी यांनी एक्सद्वारे यासंदर्भात पोस्ट करून माहिती देत सांगितले की, ‘’सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-बी च्या भुरीकवठे-वागदरी-अक्कलकोट-नागणसूर-तोळनूर ते महाराष्ट्र-कर्नाटक राज्यसीमा सेक्शनच्या रुंदीकरणासाठी ३५३.२३ कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.’’
तसेच, ‘’सदर प्रकल्पांतर्गत एकूण ४७.६६३ किमी लांबीच्या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार असून प्रकल्पामध्ये वागदरी येथे बायपास व सांगवी येथे पुलाच्या बांधकामास देखील मंजुरी देण्यात आलेली आहे.’’असंही गडकरींनी म्हटलय.
याशिवाय, ‘’या मार्ग प्रकल्पामुळे कर्नाटक राज्याकडून येणारी जड वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होणार असून आंतरराज्यीय वाहतुकीस चालना मिळणार आहे.’’ अशी माहिती दिली आहे.
तर ‘’या मार्गामुळे लातूर, उमरगा तसेच आंध्र प्रदेश येथील भाविकांना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे.’’ असंही गडकरींनी सांगितलंय.