
Nitin Gadkari : भारतातील हिंदू मंदिरांबाबत गडकरींना वाटते 'ही' खंत; म्हणाले, परदेशात...
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील हिंदू मंदिरातील स्वच्छतेबाबत खंत व्यक्त केली आहे. गडकरी म्हणाले, परदेशात जाऊन गुरुद्वारा, मशिद, चर्च बघितले आणि तिथले वातावरण पाहून आपली प्रार्थनास्थळे चांगली असावीत, असे वाटते.
नितीन गडकरी म्हणाले, आपला देशा असा आहे की विशेष करुन हिंदू समाजाच्या मंदिरात जावे तर स्वच्छता नसते. तिथे चांगल्या धर्मशाळा नसतात. मी लंडनला गेलो तर गुरुद्वारा, मस्जिद, चर्च बघितले आणि तिथले वातावरण पाहून आपली प्रार्थनास्थळे चांगली असावीत असे वाटते.
ज्यावेळी मला संधी मिळाल्यावर देहू -आळंदी-पंढरपूर पालखी मार्ग तयार केला. १२ हजार कोटींचा पालखी मार्ग तयार केला. तुळजापूर, गंगापूर, माहूर ही प्रार्थनास्थळे मी चांगल्या मार्गाला जोळण्याचा मी प्रयत्न केला, असे नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी हे स्पष्ट बोलणारे राजकारणी म्हणून ओळखले जातात. आधी विकास नंतर राजकारण, असे त्यांचे समिकरण असते. त्यांनी रोखठोकपणे भारतातील हिंदू मंदिरातील स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला आहे.