Nitin Gadkari: रस्ते अपघातातील जीव वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari: रस्ते अपघातातील जीव वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील

Nitin Gadkari: रस्ते अपघातातील जीव वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील

येणाऱ्या पाच वर्षांतमध्ये देशाची पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी वाहतूक क्षेत्राचा कायापालट करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे काम करायला हवे असे वक्तव्य केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

भारत जगातील एक अव्वल वाहन निर्मिती केंद्र बनावे यासाठी पुढील 5 वर्षांत वाहन निर्मिती उद्योग 7.5 लाख कोटींवरुन 15 लाख कोटींपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर रस्ते अपघातांच्या बाबतीत गंभीर आणि संवेदनशील दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. लोकांचे बहुमोल जीव वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असंही ते म्हणालेत. बंगळुरुमध्ये आयोजित परिवहन विकास परिषदेच्या 41 व्या बैठकीत ते बोलत होते.

हेही वाचा: Nitin Gadkari: रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये ओणवं उभं करा; मनसे आमदाराचा गडकरींना टोला

प्रदूषण तसेच खर्च कमी करण्यासाठी सर्व डिझेल बसेसच्या जागी इलेक्ट्रिक बसचा वापर करायला पाहिजे असेही गडकरी म्हणालेत. सर्वच संबंधितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करायला हवा असंही ते पुढे म्हणलेत. तसेच रस्ते अपघातांच्या बाबतीत गंभीर आणि संवेदनशील दृष्टीकोन आवश्यक असून, लोकांचे बहुमोल जीव वाचवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही नितीन गडकरी म्हणालेत.

Web Title: Nitin Gadkari Tough Decisions Have To Be Taken To Save Lives In Road Accidents

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..