Nitin Navin Statement : भाजप राष्ट्रीय अध्यक्षांचे नाक असलेल्या मतदारसंघातील पराभवानंतर नितीन नवीन यांची पहिलीच प्रतिक्रिया, 'निकालाचे गंभीर आत्मपरीक्षण करू'

BJP National President : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. निकालाचे गंभीर आत्मपरीक्षण करून पराभवाची कारणे शोधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Nitin Navin Statement bihar politics

Nitin Navin Statement bihar politics

esakal

Updated on

Nitin Navin Reaction : देशातील तीन राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. ३० वर्षे सत्ता असलेल्या बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला (भाजप) पराभवाचा सामना करावा लागला. तर गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील मांजलपूर मतदारसंघात भाजपने आपला गड कायम राखत विजय मिळवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com