
आता तिसरी आघाडी नाही तर मुख्य आघाडी बनेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सध्या देशाच्या राजकारणात अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) तिसरी आघाडी (Third Front) निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. सध्या ते चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मात्र आता त्यांनी तिसर्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. आता तिसरी आघाडी नाही तर मुख्य आघाडी बनेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आम्ही निर्णय घेतला आणि बिहारचे पक्ष एकत्र आले. ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्ष आहेत, तिथे त्यांची बैठक झाल्यास देशात वातावरण निर्माण होण्यास सुरु होईल आणि हे 2024 साठी चांगले ठरणार आहे.
पुढे ते म्हणाले, मागली काही दिवसांपासून अनेक पक्षांच्या नेत्यांकडून चर्चेसाठी मला फोन येत होते. म्हणून मी या संदर्भात दिल्लीत आलो. सोनिया गांधी यांनाही एकदा भेटणार आहे. आमच्या बाजूने 2024 ची निवडणूक चांगली ठरणार आहे, मात्र त्यांच्या बाजूने ही निवडणूक एकतर्फी असेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. तिसरी आघाडी नाही, तर मुख्य आघाडी बनणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. हरयाणातील रॅलीत मी सहभागी होणार आहे. याआधीही मी या रॅलींसाठी गेला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
यावेळी नितीश कुमार यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव घेत पुन्हा भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, अटल बिहारी वाजपेयींच्या सहा वर्षात अनेक कामे झाली आणि भाजप सरकारच्या सध्याच्या कार्यकाळात एकही नवीन काम झाले नाही. प्रत्येक गोष्टीला नावं ठेवणं आणि काम न करता प्रचार करणं, काम न करता फक्त प्रसिद्धी करायची, ही काही लोकांची सवय झाली आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
काँग्रेस असो, डावे असोत किंवा इतर पक्ष, सगळे महत्त्वाचे आहेत. सगळ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वांनी सहमती दर्शवली तर खूप चांगले वातावरण निर्माण होऊ शकते. यानंतर अनेक पक्षांचे लोक एकत्र बसतील. आम्ही हे सुरू ठेवू. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोन आला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.