Nitish Kumar Politics : नितीश कुमारांनी महाआघाडीतून बाहेर पडणं काँग्रेससाठी गुड न्यूज?

Nitish Kumar Bihar Politics Latest News : नितीश कुमार हे मगील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी नुकतेच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून महाआघाडीतून बाहेर पडून ते भाजपच्या मदतीने पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
Nitish Kumar Bihar Politics Latest News
Nitish Kumar Bihar Politics Latest News

Nitish Kumar Bihar Politics Latest News : बिहारचे ज्येष्ठ नेते नितीश कुमार हे सध्या मगील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी नुकतेच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून महाआघाडीतून बाहेर पडून ते भाजपच्या मदतीने पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे नितीश कुमार यांचा जेडीयू हा पक्ष विरोधकांच्या इंडिया आघाडीत होता. मात्र लोकसभा निवडणूकीच्या आधीच नितीश कुमारांनी इंडिया आघाडीची देखील साथ सोडली आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून एकमत होत नव्हते. यादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये टीएमसी एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. असाच प्रकार पंजाबमध्ये देखील पाहायला मिळू शकतो.

येथे आम आदमी पक्ष एकटाच सर्व जागांवर लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसच्या अडचणी या दोन्ही राज्यात वाढताना दिसत आहेत. यादरम्यान आता बिहारमध्ये नितीश कुमार यांनी महाआघाडी सोबतच इंडिया आघाडीची साथ देखील सोडली आहे. त्यामुळे बिहारमध्ये काँग्रेससाठी इतर पक्षांकडून लोकसभेच्या जास्त जागा मिळवण्याचा मार्ग नक्कीच सोपा झाला आहे.

Nitish Kumar Bihar Politics Latest News
Nitish Kumar News : नितीश कुमार पुन्हा NDAमध्ये परतले तर फायदा कोणाला? जाणून घ्या सविस्तर

नितीश कुमार (Nitish Kumar Latest News) यांनी महाआघाडीची साथ सोडणं काँग्रेससाठी गुड न्यूज आहे. कारण काँग्रेसला ४० लोकसभा जागा असलेल्या बिहारमध्ये जागा वाटपाबाबत वाटाघाटी करवी लागली असती असा एक पक्ष आता कमी झाला आहे. जर नितीश कुमार यांचा पक्ष इंडिया आघाडीचा भाग असता तर जागावटाप करताना काँग्रेसला इतर घटक पक्षांसोबत जागावाटपात नक्कीच अडचणींचा सामना करावा लागला असता.

नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू लोकसभा निवडणुकीत जागांची मागणी मोठी होती, मात्र नितीश कुमार इंडिया आघाडीच्या संथ गतीमुळे नाराज होते. तसेच त्यांना कमी जागांवर निवडणूक लढवणे देखील मान्य नव्हते.

Nitish Kumar Bihar Politics Latest News
Nitish Kumar Explained: नितीश कुमारांचे 'पलटी' राजकारण, सतत बदलत्या भूमिकांचा राजकीय इतिहास जाणून घ्या...

आता नितीश कुमार यांनी महाआघाडी तसेच इंडिया आघाडीला बगल दिल्यानंतर काँग्रेस इतर घटक पक्षांकडून जास्त जागांची मागणी करु शकते. नितीश कुमार असताना हे शक्य नव्हते. आता बिहारमध्ये डावे पक्ष आणि आरजेडी यांच्यासोबत फक्त काँग्रेसच इंडिया आघाडीचा भाग उरल्याने, ते लोकसभा निवडणुकीत जास्त जागांवर दावा करु शकतात. तसेच पक्षांना काँग्रेसला जास्त जागा सोडण्यात अडचणही वाटणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com