स्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

महाआघाडीला सोडचिट्ठी देत नितीश कुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे.

नवी दिल्ली : "नितीश कुमार यांनी आम्हाला दगा दिला आहे. ते भाजपसोबत काहीतरी डावपेच आखत आहेत याची आम्हाला कल्पना आली होती," अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नितीश यांच्यावर टीका केली. 

काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासोबत मागील 20 महिन्यांपासून असणाऱ्या महाआघाडीला सोडचिट्ठी देत नितीश कुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. नितीश यांनी पाटणामध्ये सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमानंतर राजधानी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी नितीश यांच्यावर जोरदार टीका केली. या घडामोडींवर राहुल यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. 

राहुल यांनी सांगितले की, "नितीश कुमार काही दिवसांपूर्वीच मला भेटले होते, परंतु त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही. बिहारच्या जनतेने जातीयवादाविरोधात लढण्यासाठी नितीश यांच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, आता नितीश यांनी स्वतःच्या राजकीय लाभासाठी जातीयवाद्यांशीच हातमिळवणी केली. हीच आपल्या देशातील राजकारणातील मेख आहे."

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: nitish kumar news rahul gandhi slams nitish JDU bjp alliance