नितीश कुमार उभ्या जन्मात होणार नाहीत पतंप्रधान; भाजपचा टोला

लालू प्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल बिहारला जेडीयूमुक्त करणार
Nitish Kumar
Nitish Kumarsakal
Updated on

नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजपची साथ सोडत लालू प्रसाद यादव यांच्या राजदशी हातमिळवणी करुन सत्तेत आलेल्या नितीश कुमारांना भाजपनं झटका दिला आहे. नितीश कुमार हे उभ्या जन्मात कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, अशा शब्दांत बिहारचे माजी उपमुख्यंमत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी म्हटलं आहे. (Nitish Kumar will never become Prime Minister in his life says BJP Sushil Modi)

Nitish Kumar
USA: वॉलमार्ट स्टोअरवर विमान क्रॅश करण्याची धमकी; अमेरिकेत खळबळ

सुशील मोदी म्हणाले, "अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर आता जेडीयूमुक्त झाले आहेत. त्यानंतर बिहारमध्ये लवकरच लालू प्रसाद यादव हे जुडीयूत फूट पाडतील आणि बिहार जेडीयूमुक्त करतील" जेडीयूच्या आरोपांवर बोलताना मोदी म्हणाले, "जेडीयूचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांचे आमदार इतके कमजोर आहेत का? की त्यांना विकत घेतलं जाईल. जर असतील तर त्यांनी आत्मपरीक्षण करावं. मणिपूरमधील जेडीयूच्या आमदारांनी स्वतःहून भाजपत प्रवेश केला आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता. त्यांना एनडीएसोबत यायचं होतं"

Nitish Kumar
"काँग्रेस भारतातून नष्ट होतेय अन् जगातून कम्युनिस्ट"; अमित शहांचा हल्लाबोल

जेडीयू आता राष्ट्रीय पक्षापासून खूप दूर गेली आहे. त्यांना राष्ट्रीय पक्ष व्हायची इच्छा होती. आलिकडेच त्यांचा पक्ष तीन राज्यांमध्ये होता पण आता तो केवळ बिहारपुरताच उरला आहे. ते आता राष्ट्रीय पक्ष होऊ शकत नाही. बिहारमध्ये एनडीएशी नातं तोडल्याचे हे परिणाम आहेत. इतर राज्यातील आमदार आणि कार्यकर्त्यांची एनडीएतून बाहेर पडायची इच्छा नव्हती, असंही सुशील मोदी यांनी म्हटलं आहे.

Nitish Kumar
Sonali Phogat : प्रॉपर्टी अन् आरोपी! हत्या प्रकरणात नवा खुलासा

सन २०२४च्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी नितीश कुमार इच्छुक असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना सुशील मोदी म्हणाले, नितीश कुमार यांनी एनडीएसोबतची युती तोडली ती केवळ राष्ट्रीय बातम्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी. पण ते देशाचे पंतप्रधान कधीही होऊ शकणार नाहीत. पोस्टर आणि होर्डिंग कोणालाही पंतप्रधान करत नाहीत. ज्यांच्या पक्षाचे केवळ ५ ते १० खासदार आहेत ते पंतप्रधान कसे होणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com