नितीश कुमारांच्या विश्‍वासू सहकाऱ्यांकडे प्रचाराची धुरा 

JDU-Leader
JDU-Leader

पाटणा - बिहारमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाची गाभा समिती, उच्च स्तरीय समिती असून त्यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तील घटक पक्ष संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष व राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही जबाबदारी त्यांच्या खास सहकाऱ्यांवर सोपविली आहे. गेली काही वर्षे ‘जेडीयू’चे रणनितीकार असलेले प्रशांत किशोर यंदाच्या निवडणुकीतून गायब झालेले आहेत. 

नितीश कुमार यांनी ललनसिंह, आर. सी. पी. सिंह, विजय चौधरी, वशिष्ठ नारायणसिंह, अशोक चौधरी व संजय झा या त्यांच्या सहा रत्नांच्या हाती प्रचाराची सूत्र सोपविली आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ललनसिंह
नितीश कुमार यांचे कान व डोळे समजले जाणारे ललनसिंह हे मुंगेरचे खासदार आहेत. राष्ट्रीय जनता दला (आरजेडी)चे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना चारा भ्रष्टाचार प्रकरणात अडकवून बिहारच्या राजकारणातून बाहेर काढून नितीश कुमार यांच्या मार्ग मुक्त करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. गंभीर प्रकृतीचे नेते अशी ओळख असलेल्या ललनसिंह यांच्याकडे नेत्यांवर नियंत्रण, जागा वाटपापासून सहकारी पक्षांशी चर्चा अशी जबाबदारी आहे.

आर. सी. पी. सिंह
राज्यसभेचे सदस्य असलेले आर. सी. पी. सिंह हे माजी सनदी अधिकारी असल्याने त्यांना प्रशासकीय कामाचा दीर्घ अनुभव आहे. ‘जेडीयू’तील महत्त्वाचे स्थान असलेल्या सिंह  यांचा उमेदवारांच्या निवडीपासून सहकारी पक्षांबरोबर चर्चा करण्यात सहभाग असणार आहे.

वसिष्ठ नारायणसिंह
‘जेडीयू’चे प्रदेश अध्यक्ष वसिष्ठ नारायणसिंह हे पक्ष नेते व कार्यकर्त्यांचे ‘दादा’ आहेत. पक्षातील लहान-मोठे नेते, कार्यकर्ते व नितीश कुमार यांच्यातील ते दुवा आहेत. नेते व कार्यकर्ते यांची मते, विचार वशिष्ठ नारायणसिंह यांच्या माध्यमातून नितीश कुमार यांच्या पर्यंत पोचविले जातात, असे सांगण्यात येते.

विजय चौधरी 
विजय चौधरी विधानसभेचे सभापती व  नितीश यांचे पडद्यामागील रणनितीकार आहेत. जीनतराम मांझी यांना ‘जेडीयू’बरोबर घेण्यात व उमेदवार निवडीतही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

अशोक चौधरी 
नितीश कुमार यांचे अत्यंत विश्‍वासू नेते असलेल्या अशोक चौधरी यांची ‘जेडीयू’च्या कार्यकारी अध्‍यक्षपदी नियुक्ती केली आहे. ते पक्षाचा दलित चेहरा असून कुशल रणनीतिकार व संघटक आहेत. 

संजय झा
संजय झा यांची दिल्‍लीतील राजकारणावर मजबूत पकड आहे. ‘जेडीयू’ला महाआघाडीपासून वेगळे करून ‘एनडीए’त भाजपबरोबरील हातमिळवणीत  त्यांचा मोठा हात होता. सोशल मीडियात पक्ष व सरकारची बाजू सक्षमपणे मांडण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. पहिली व्हर्च्युअल सभा यशस्वी करण्‍याचे श्रेय त्यांच्याकडे जाते

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com