नितीश, मोदींनी बिहारला लुटले : राहुल गांधी

वृत्तसंस्था
Wednesday, 4 November 2020

बिहारमधील किशनगंज येथे आयोजित सभेत बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांना चांगलेच धारेवर धरले.  नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी एकत्र येऊन बिहारची लूट केली आहे, असा आरोप त्यांनी केला.

किशनगंज - बिहारमधील किशनगंज येथे आयोजित सभेत बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांना चांगलेच धारेवर धरले. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी एकत्र येऊन बिहारची लूट केली आहे, असा आरोप त्यांनी केला.

बिहारमधील शेतकरी, कामगार आणि छोट्या दुकानदारांना त्यांनी अक्षरशः नष्ट केले. आता लोकांनीच महाआघाडीला विजयी करून राज्य बदलण्याची प्रक्रिया सुरू करावी. छत्तीसगड सरकार थेट लोकांच्या खात्यामध्ये पैसे टाकते, बिहारमधील सरकार मात्र लोकांकडून पैसे काढून घेण्याचे काम करते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्राने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. हे कायदे मोदींनी त्यांच्या मित्रांसाठी आणले आहेत. शेतकरी हे अंबानी आणि अदानी यांच्यासोबत सौदा करू शकतील का, यातील एकजण मुंबईमध्ये असतो दुसरा गुजरातमध्ये आहे. तुम्ही मात्र येथे बिहारमध्ये आहात मग त्यांच्याशी सौदा करायचा तरी कसा सवाल राहुल यांनी केला.

Bihar Election- बिहारमध्ये सायंकाळी पाचपर्यंत 51 टक्के मतदान

नितीशकुमारांवर कांदे-दगड
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे आज प्रचारासाठी मधुबनी येथे पोचले. येथे त्यांना स्थानिकांच्या रोषास सामोरे जावे लागले. नितीश हे भाषण करत असताना अनेकांनी त्यांच्यावर कांदे आणि दगडांचा मारा केला. मद्यविक्रीच्या मुद्यावरून लोक भडकले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.

मशिदीत घुसून हनुमान चालीसा पठण; फेसबुक लाइव्हसुद्धा केलं

संघावर टीका
राहुल यांनी वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधला. भाजप आणि संघ देशामध्ये द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहेत. आम्ही मात्र या दोन्ही संघटनांसोबत लढत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात महाआघाडी महाविजयी होईल, तेजस्वी यांचे टीकाकार निकालानंतर खामोश होतील. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा विजयी होईल.
- शत्रुघ्न सिन्हा, नेते काँग्रेस

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitishkumar Narendra Modi looted Bihar Rahul Gandhi