युक्रेनमधून परतलेले मेडिकल स्टुडंटस जगातील कोणत्याही विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करू शकणार

NMC निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
medical student
medical studentesakal
Updated on

रशिया आणि युक्रेनमध्ये झालेल्या युध्दात भारतीय विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना आता जगातील कोणत्याही देशातील विद्यापीठातून एमबीबीएस पूर्ण करण्याची परवानगी दिली जाणार आहे. विद्यार्थांची परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने याबाबत आदेश जारी केला आहे.

युक्रेनने देऊ केलेल्या शैक्षणिक गतिशीलता कार्यक्रमाला मान्यता देण्यास सहमत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना युक्रेनच्या मूळ विद्यापीठातूनच पदव्या दिल्या जातील. रशिया-युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये शिकणाऱ्या अनेक भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतावे लागले. अशा स्थितीत या विद्यार्थ्यांचा अभ्यास रखडला आहे. मात्र आता एएमसीच्या या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

medical student
दिल्लीत फटाक्यांशिवाय दिवाळी: AAP सरकारचा मोठा निर्णय

NMC कायदा काय म्हणतो?

एनएमसी कायद्यानुसार, परदेशी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करून एकाच विद्यापीठातून पदवी घेणे बंधनकारक आहे. NMC कडून प्रसिध्द केलेल्या नोटीसमध्ये सांगितल की

युक्रेनने जाहीर केलेल्या कार्यक्रमावर परराष्ट्र मंत्रालयाशी सल्लामसलत करून विचार केला गेला आहे, ज्यामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की शैक्षणिक कार्यक्रमचे जागतिक स्तरावर विविध देशांतील इतर विद्यापीठांमध्ये तात्पुरते हस्तांतरण केले आहे.

युक्रेन विद्यापीठातूनच मिळणार डिग्री

NMC च्या आधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये सांगितले आहे की युक्रेन मधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थांना देशातील कोणत्याही कॉलेज मधून करता येणार आहे, पण डिग्री मात्र युक्रेन विद्यापीठातूनच मिळणार आहे. सार्वजनिक नोटीसमध्ये सांगितले की युक्रेनमध्ये शिकत असलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या संदर्भात आयोगाने शैक्षणिक गतिशीलता कार्यक्रमास हरकत नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com