

Uttarakhand’s Famous Bhang Chutney Wins Hearts with Flavor, Not Intoxication
esakal
उत्तराखंडच्या देवभूमीतील खाद्यसंस्कृती ही तिच्या नैसर्गिक आणि अस्सल चवींसाठी ओळखली जाते. याच खाद्यसंस्कृतीचा एक अत्यंत वेगळा आणि लोकप्रिय प्रकार म्हणजे 'भांगची चटणी' (Bhang Ki Chutney)! 'भांग' हे नाव ऐकून अनेकांच्या मनात नशेचा विचार येतो, परंतु ही चटणी पूर्णपणे सुरक्षित आणि नशामुक्त असते. याचे कारण म्हणजे ही चटणी भांगच्या पानांपासून नव्हे, तर भांगच्या बियांपासून (Hemp Seeds) तयार केली जाते.