esakal | दूध दरवाढीची घोषणा केलेली नाही - किसान मोर्चा

बोलून बातमी शोधा

नवी दिल्ली - गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सोमवारी खास पंजाबमधून आणण्यात आलेल्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.}

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच काही शेतकरी नेत्यांनी दुधाचे दर हे लिटरला शंभर रुपये एवढे करण्याची घोषणा केली होती. आता या घोषणेबाबत संयुक्त किसान मोर्चानेच हात झटकले आहेत. आम्ही अशी घोषणा केलीच नव्हती, असे किसान मोर्चाकडून आज सांगण्यात आले.

दूध दरवाढीची घोषणा केलेली नाही - किसान मोर्चा
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असतानाच काही शेतकरी नेत्यांनी दुधाचे दर हे लिटरला शंभर रुपये एवढे करण्याची घोषणा केली होती. आता या घोषणेबाबत संयुक्त किसान मोर्चानेच हात झटकले आहेत. आम्ही अशी घोषणा केलीच नव्हती, असे किसान मोर्चाकडून आज सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसरीकडे सिंघू व टिकरी सीमांवरील शेतकरी आंदोलकांची गर्दी ओसरत असतानाच शेतकरी नेत्यांमधील संवादाचा अभाव वारंवार जाणवू लागला आहे. दरम्यान किसान संघर्ष समितीने लाल किल्ल्यावरील हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी धरपकड केलेल्या शेतकऱ्यांच्या सुटकेसाठी जोर लावला आहे.  त्यांना कायदेशीर मदत मिळावी म्हणून  प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत ७८ शेतकऱ्यांना जामीन मिळाला आहे. 

प्रशांत किशोर आता पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार

पिके नष्ट करण्यावरून घूमजाव
शेतकऱ्यांनी कायदे रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा म्हणून उभी पिके नष्ट करावीत असे आवाहन करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी तसे अघोरी प्रकार सुरू केले होते. यावर टिकैत यांनाही मी तसे आवाहन केले नव्हते असे स्पष्टीकरण द्यावे लागले. आता दूध दरांवरून संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख डॉ. दर्शन पाल यांनाच खुलासा करावा लागला आहे. मुळात "भाकियू''चे मकलीत सिंग यांनी हे आवाहन केले होते. ते आंदोलनातील एक प्रमुख नेते आहेत. सरकारशी सुरू असलेल्या चर्चेतील ४० नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश आहे. त्यांनी दूध सध्याच्या ५० रुपये लिटरवरून दुपटीने म्हणजे १०० रुपये लिटरप्रमाणे महाग विकावे असे आवाहन केले होते. यानंतर अनेक गावांनी दर वाढविल्याने शेतकरी नेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे.

आएशाचा शेवटचा कॉल होतोय व्हायरल; नवरा म्हणाला 'जीव देतानाचा व्हिडिओ पाठवून दे'!

आंदोलनाचे केंद्र सरकले
शेतकरी आंदोलनाचे केंद्र डाव्यांची पकड असलेल्या सिंघू-टिकरीकडून राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखालील भारतीय किसान युनियनचे वर्चस्व असलेल्या गाझीपूर सीमेकडे सरकल्यापासून काही शेतकरी नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. यातूनच अशा प्रकारचे  खुलासे येत असल्याचे आंदोलनाशी संबंधित सूत्रांनी "सकाळ'' ला सांगितले.

Edited By - Prashant Patil