टेस्ट न देताच मिळवा ड्रायव्हिंग लायसेन्स; सरकार आणतंय नवा नियम

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 7 February 2021

ड्रायव्हिंग लायसेन्स बनवणे कटकटीचे काम मानले जाते

नवी दिल्ली- ड्रायव्हिंग लायसेन्स बनवणे कटकटीचे काम मानले जाते. लायसेन्ससाठी आरटीओ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात, दलालांना हाती घ्यावं लागतं. सरकारने ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन केल्याने काही प्रमाणात अडचण कमी झाली आहे. सरकार यात आता आणखी बदल करणार आहे, केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय असा नियम करणार आहे की, ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरवर ट्रेंनिंग घेतल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी अर्ज केल्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला लागू नये. याचा अर्थ जर तुम्ही ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरमधून गाडी चालवण्यास शिकला आहात, तर तुम्हाला लायसेन्ससाठी पुन्हा टेस्ट द्यावी लागणार नाही. 

लहान मुलांनाही लवकरच कोरोनाची लस; भारत ठरणार जगातील पहिला देश?

केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या योजनेवर काम करणे सुरु केले आहे. मंत्रालयाने यासाठी ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केले असून लोकांकडून सल्ला मागितला आहे. 

ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटरला मान्यता

या योजनेंतर्गत टेस्टसाठी ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटरला मान्यता देण्यात येईल. यासाठी मंत्रालय अधिसूचना जारी करु शकते. असे असले तरी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरला सरकारने जारी केलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने लोकांच्या सूचनांसाठी ड्राफ्ट नोटिफिकेशन आपल्या वेबसाईटवर अपलोड केले आहे. तुम्हीही यावर आपल्या सुचना देऊ शकता. 

ड्रायव्हिंग लायसेन्सविना गाडी चालवणे कायदेशीर गुन्हा आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसेन्सला ओळखपत्र म्हणूनही मान्यता आहे. तसेच तुम्ही भारताच्या ड्रायव्हिंग लायसेन्ससोबत इतर काही देशांमध्येही गाडी चालवू शकता. पण, यासाठी तुम्हाला आरटीओची परवानगी घ्यावी लागते. 

नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळले ते अभिनेत्रीचे पॉर्न फोटोशूट; महत्त्वाच्या बातम्या...

घरबसल्या करा रिन्यू

कोरोना महामारीच्या काळात तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसेन्स रिन्यू करायचं आहे आणि तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची सुविधा उपलब्ध नाही, अशावेळी तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसेन्स रिन्यू करु शकता. यासाठी तुम्हाला वेबसाईटवरील एक फॉर्म डाऊनलोड करावा लागेल आणि स्कॅन करुन याला अपलोड करावे लागेल. याशिवाय जर तुमचे वय 40 वर्षांपेक्षा अधिक असेल, तर तुम्हाला सर्टिफाईड डॉक्टरकडून भरुन घेतलेला फॉर्म 1ए लागेल. ओरिजनल एक्सपायर्ड ड्रायव्हिंग लायसेन्स, पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्डला अपलोड करावे लागेल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no need to give test for getting driving licence