एकाही व्यक्तीला देशाबाहेर काढू देणार नाही - ममता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

ममता बॅनर्जी यांच्याकडून सुधारित नागरिकत्व कायद्याला सातत्याने विरोध करत आहेत. त्यासाठी त्या गेले काही दिवस राज्यभर विविध भागांत मोर्चेही काढत आहेत. पुरुलिया येथे झालेल्या एका रॅलीदरम्यानही त्यांनी भाजपला एकटे पाडण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही केवळ मतदान यादीत आपले नाव अचूक आहे की नाही याची खात्री करा, आम्ही एकाही व्यक्तीला देशाबाहेर काढू देणार नाही, हे आमचे वचन आहे.’’

पुरुलिया (पं. बंगाल) - ‘‘भाजपला एकटे पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. एकाही व्यक्तीला आम्ही देशाबाहेर काढू देणार नाही,’’ असे प्रतिपादन पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ममता बॅनर्जी यांच्याकडून सुधारित नागरिकत्व कायद्याला सातत्याने विरोध करत आहेत. त्यासाठी त्या गेले काही दिवस राज्यभर विविध भागांत मोर्चेही काढत आहेत. पुरुलिया येथे झालेल्या एका रॅलीदरम्यानही त्यांनी भाजपला एकटे पाडण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही केवळ मतदान यादीत आपले नाव अचूक आहे की नाही याची खात्री करा, आम्ही एकाही व्यक्तीला देशाबाहेर काढू देणार नाही, हे आमचे वचन आहे.’’

बिपीन रावत यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती

ममता बॅनर्जी यांच्या सरकारने राज्यात एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा लागू करणार नाही, अशा जाहिराती देण्यास सुरुवात केली होती. राज्य सरकारच्या या जाहिरातींना कोलकता उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावर सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने या जाहिराती तातडीने बंद करण्याचे आदेश दिले होते.

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आग; आग लागल्याने रस्ता बंद

एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याची देशभरात अंमलबजावणी करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह वारंवार सांगत आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीलाच सुधारित नागरिकत्व कायदा मंजूर करण्यात आला. त्यावरून देशभरात गदारोळ सुरू असून, विविध संघटना आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No one will be allowed out of the country mamta banerjee