दिल्लीतील प्रदूषणाबाबत 'गंभीर'च नाही; बैठक बारगळली 

वृत्तसंस्था
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नगरविकास मंत्रालयाशी संबंधित संसदीय स्थायी समितीची बैठक शुक्रवारी प्रस्तावित होती. या बैठकीत दिल्ली आणि राजधानी क्षेत्रात गंभीर बनलेल्या प्रदूषणावर चर्चा होणार होती. बैठकीचे वेळापत्रक आणि कार्यक्रम पत्रिका सर्व संबंधित खासदार, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आली होती.

नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीच्या प्रदूषणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली गंभीर दखल, तर दुसरीकडे पंजाब, हरियाना आणि दिल्ली या राज्यांचे एकमेकांवर खापर फोडणे सुरू असताना या गंभीर मुद्द्यावर संसदेच्या स्थायी समितीची बैठक संबंधित अधिकारीच नव्हे, तर खासदारांच्या 'दांडी यात्रे'मुळे बारगळली. भाजप खासदार गौतम गंभीर बैठक सोडून इन्दूरला समालोचन करत असल्याने त्याच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नगरविकास मंत्रालयाशी संबंधित संसदीय स्थायी समितीची बैठक शुक्रवारी प्रस्तावित होती. या बैठकीत दिल्ली आणि राजधानी क्षेत्रात गंभीर बनलेल्या प्रदूषणावर चर्चा होणार होती. बैठकीचे वेळापत्रक आणि कार्यक्रम पत्रिका सर्व संबंधित खासदार, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आली होती. मात्र, बहुतांश खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. दिल्लीचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे खासदार गौतम गंभीर हेही या बैठकीस आले नव्हते. इन्दूरमध्ये ते पोहे आणि जिलेबी खाताना फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दोन्ही सभागृहे मिळून 31 खासदार या संसदीय समितीचे सदस्य आहेत; परंतु फक्त चारच खासदार बैठकीस पोहोचले होते. त्यात समितीचे अध्यक्ष असलेले भाजप खासदार जगदंबिका पाल, नॅशनल कॉन्फरन्सचे हस्नेन मसुदी, सी. आर. पाटील आणि संजयसिंह यांचा समावेश होता. 

काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला झुकते माप देण्याची शक्यता

विशेष म्हणजे दिल्लीतील तीन महापालिकांचे आयुक्त, दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष, पर्यावरण सचिव आणि संयुक्त सचिवही बैठकीस पोहोचले नव्हते. साहजिकच खासदार मंडळी आणि अधिकाऱ्यांच्या या उदासीनतेमुळे बैठक रद्द करावी लागली. समितीचे अध्यक्ष जगदंबिकापाल यांनी या दांडीबहाद्दर खासदार आणि अधिकाऱ्यांविरुद्ध लोकसभेच्या सभापतींकडे तक्रार करण्याची तयारी केली आहे. या गैरहजेरीची चर्चा रंगल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने संयुक्त सचिवांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागल्यामुळे बैठकीस हजर राहता आले नाही, असा खुलासा करून सारवासारव केली. 

'105 किंकाळ्या' आणि वेड्यांचा घोडेबाजार; शिवसेनेचा वार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No show by netas at crucial pollution meet Blame jalebis and miscommunication