esakal | भाजपमध्ये जाणार नाही; सचिन पायलट यांचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Pilot

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे पायलट यांनी स्पष्ट केले आहे. सचिन पायलट भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. 

भाजपमध्ये जाणार नाही; सचिन पायलट यांचा खुलासा

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

नवी दिल्ली : राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे भारतीय जनता पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे पायलट यांनी स्पष्ट केले आहे. सचिन पायलट भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सचिन पायलट यांनी रविवारी आपल्याला पक्षाच्या ३० आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला असला तरी त्यांनी भारतीय जनता पक्षातही प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केल्याने सचिन पायलट आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात मात्र, त्यांच्याकडे ९० आमदारांचाच पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
-----------------
राजस्थानात सत्ताबदल झाल्यास मायावतींना होणार सर्वाधिक आनंद 
------------------
काँग्रेसची मध्यरात्री अडीच वाजता पत्रकार परिषद; केला 'हा' मोठा दावा
------------------
राजस्थान विधानसभेत १०७ एवढे संख्याबळ असलेल्या काँग्रेसला १३ अपक्षांसह भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन आमदारांनी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या दोन तृतीयांश म्हणजे १०७ पैकी ७२ आमदारांनी पक्षांतर केले, तर ते पक्षांतरबंदी कायद्यापासून वाचू शकतात. परंतु, एवढ्या मोठ्या संख्येने काँग्रेसचे आमदार फुटणे अशक्य असल्याचे मानले जात असल्याने तूर्तास पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करणार नसले तरी काय भूमिका घेणार याकडे मात्र राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

loading image