पत्रकार कमाल खान यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन | Kamal Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Journalist Kamal Khan

पत्रकार कमाल खान यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

नवी दिल्ली : प्रसिद्ध पत्रकार कमाल खान यांचे आज शुक्रवारी (ता.१४) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने लखनऊ येथे निधन झाले. ते एनडीटीव्ही इंडिया या वृत्तवाहिनीत लखनऊ ब्युरो प्रमुख म्हणून कार्यकरत होते. त्यांच्या निधनाने भारताने सर्वात्तम पत्रकाराला गमावला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर कमाल खान (Kamal Khan) यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी भारतीय प्रशासकीय अधिकारी (आयएएस) सूर्याप्रताप सिंग (Surya Pratap Singh) आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की माझ्या मित्रा कमाल खानने प्रमाणिकपणे काम करण्याचे असे काही ओझे घेतले की क्रूर हार्ट अॅटॅकने तुझा जीवच घेतला. दुःखी झालो, स्तब्ध झालो. तुमच्या खऱ्या पत्रकारितेला (Journalism) मनापासून सलाम ! तुमच्या कुटुंबीयांसाठी माझ्या सहवेदना.(Noted Journalist Kamal Khan Passes Away In Lucknow)

भावपूर्ण श्रद्धांजली !

हेही वाचा: पंजाबचे CM चन्नी PM मोदींना म्हणाले ‘तुम्ही कयामतपर्यंत जगा’

पत्रकार राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) म्हणतात, सकाळीच खूपच वेदनादायी बातमी कळली. एनडीटीव्ही इंडियाचे लखनऊचे सर्वोत्तम बातमीदार कमाल खान आणि प्रिय मित्राचे सकाळी निधन झाले. माझ्या प्रिय मित्रा तुझी नेहमी आठवण आणि आपल्या दीर्घ संवाद लक्षात राहील. खूप काही आठवणी आहेत. श्रद्धांजली!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top