घोडेबाजार वाढला म्हणत अशोक गेहलोत यांनी घेतला 'हा' निर्णय

Now MLAs Off To Jaisalmer As Ashok Gehlot Says Horse Trading Rates Up
Now MLAs Off To Jaisalmer As Ashok Gehlot Says Horse Trading Rates Up

जयपूर : राजस्थानमधील सत्तासंघर्ष काही केल्या शांत होताना दिसत नाही. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आता भारतीय जनता पक्षावर आमदारांच्या घोडेबाजाराचा आरोप केला आहे. घोडेबाजार वाढला असल्याचे म्हणत त्यांनी काँग्रेस आमदारांना जैसलमेरमधील एका अलिशान हॉटेलमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राजस्थानमध्ये माजी उप-मुख्यमंत्री सचिन पायलट समर्थक आमदारांना नोटीसी पाठल्यानंतर राजस्थानात राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक गोष्ट करण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) सरकारजवळ बहुमत असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत होता. अशात अशोक गेहलोत यांनी आपल्या सर्व समर्थक आमदारांना स्पेशल विमानाने जयपूरव्यतिरिक्त वेगळ्या ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत काँग्रेस समर्थक सर्व आमदारांना जयपुरमधील फेयरमाउंट हॉटलमध्ये थांबविण्यात आले होते.

मुख्यमंत्री गेहलोत यांनी काल (ता. ३०) गुरुवारी आमदारांच्या घोडेबाजारीवरून आरोप केले होते. गेहलोत म्हणाले होते की, 'काल विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची घोषणा झाल्यापासून राजस्थानमध्ये आमदारांच्या घोडेबाजारीचा दर वाढला आहे. यापूर्वी १० कोटींचा दर होता त्यानंतर तो १५ कोटीपर्यंत गेला असल्याचेही गेहलोत म्हणाले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ३१ जुलै रोजी विधानसभा अधिवेश बोलविण्याची मागणी केली होती. परंतु, राज्यपालांनी त्यांचा तीनवेळा प्रस्ताव नाकारला होता. चौथ्या प्रस्तावानंतर राज्यपालांना विधानसभा अधिवेशन बोलविण्यास मंजुरी दिली. त्यावेळी गेहलोत यांनी स्पष्ट केले होते की, सरकारकडे स्पष्ट बहुमत असून ते कधीही विधानसभेत सिद्ध करू शकतात. २०० सदस्य असलेल्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी अशोक गेहलोत यांना १०१ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com