आता मोबाईलवर बघता येणार पीएफ

Now we can see PF on mobile by umang app
Now we can see PF on mobile by umang app

मुंबई : सरकारने डिजीटल व्यवहाराचा आग्रह धरत अनेक योजनांचा लाभ, योजनांमध्ये नोंदणीसाठी डिजीटल प्रक्रीयेचा अवलंब केला आहे. त्यातच 'उमंग' या सरकारी अॅपची भर पडली आहे. 

मोबाईलवरुन नेट बँकींग, बिल पेमेंट, पेटीएम, गुगल पे यावरुन आर्थिक व्यवहार करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. यातच आता मोबाईलवर आपला प्रोव्हिडंट फंड देखील सहज बघता येणार आहे. आपल्या पीएफच्या खात्यात किती पैसे शिल्लक आहे, हे 'उमंग'द्वारे पाहता येणार आहे. 

ईएफओ कापला जात असेल तर 6 लाखांपर्यंत विमा मिळण्याची घोषणा अर्थसंकल्पात 2019 मध्ये करण्यात आली.

Budget 2019 : मोदी सरकारचा असंघटित कामगार, नोकरदारांसाठी मोठा निर्णय

'उमंग' या अॅपवर ही सुविधा सरकारकडून उपलब्ध करण्यात आली आहे. तर आपल्या पीएफ ची शिल्लक रक्कम कशी पाहता येईल?

  • प्ले स्टोअरमधून उमंग अॅप डाउनलोड करा.
  • फोन क्रमांक नोंद करुन लॉग इन करा. 
  • स्क्रिनच्या सुरवातीला डाव्या कोपऱ्यात सर्व्हिस डायरेक्ट्रीमध्ये जाऊन अॅपवर लॉग इन करा. 
  • इपीएफओ ऑप्शनवर क्लिक करा. 
  • व्ह्यू पासबुक ऑप्शनवर क्लिक करा.
  • तिथे युएन नंबर टाइप करा. 
  • मोबाइलवर आलेल्या ओटीपीच्या सहाय्याने पासबुक उघडता येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com