आता तुम्हीही घेऊ शकता भाड्याने ट्रेन, जाणून घ्या सरकारची योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

आता तुम्हीही घेऊ शकता भाड्याने ट्रेन, जाणून घ्या सरकारची योजना

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railways) मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत कोणतेही राज्य सरकार किंवा कंपनी ट्रेन भाड्याने घेऊ शकते. याबाबत रेल्वे मंत्रालयाशी संबंधितांशी चर्चा करण्यात आली असून, या सेवेसाठी रेल्वे किमान शुल्क आकारणार आहे. या योजनेंतर्गत, 3333 कोच म्हणजेच 190 गाड्या रेल्वेने निश्चित केल्या आहेत.

हेही वाचा: झी न्यूज आणि टाइम्स नाऊवर कारवाई; चुकीच्या आणि एकांगी वार्तांकनावर ठपका

भारत गौरव ट्रेन धावणार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत गौरव ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. भारत गौरव गाड्या भारताची संस्कृती आणि वारसा दर्शविणाऱ्या थीमवर आधारित असतील. यासाठी सुमारे 190 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास गाड्यांची संख्या वाढविता येईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे.

या गाड्या पर्यटन स्थळांसाठी चालविल्या जाणार आहेत. भारत गौरव ट्रेन, रामायण ट्रेनमुळे लोकांना भारतीय संस्कृती, आपली विविधता आणि वारसा यांची ओळख करून घेण्याची संधी मिळेल. रेल्वे येत्या काळात गुरुकृपा आणि सफारी ट्रेन चालविणार असल्याचेही रेल्वेमंत्री म्हणाले.

हेही वाचा: IND vs NZ : टीम इंडियाला मोठा धक्का; स्टार फलंदाज मालिकेबाहेर

आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून या गाड्यांसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एसी, नॉन एसी अशा सर्व प्रकारच्या गाड्यांचा समावेश असेल. याशिवाय रेल्वेचे मार्ग ठरविण्याचे अधिकार कंपनीला असतील. भारत गौरव ट्रेन खासगी क्षेत्र आणि IRCTC या दोघांद्वारे चालविली जाऊ शकते आणि या गाड्यांचे भाडे टूर ऑपरेटर ठरविणार आहे.

loading image
go to top