Coronavirus : भारतात अद्यापही कोरोनाचे संकट; अशी आहे सद्यस्थिती!

Coronavirus : भारतात अद्यापही कोरोनाचे संकट; अशी आहे सद्यस्थिती!

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारत, युरोप, फ्रान्स, इटली, अमेरिकेसह इतर देशांत कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. भारतातही याचे प्रमाण वाढत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 46,437 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

'वर्ल्ड मीटर्स'नुसार, देशभरात सध्या 46,437 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1,566 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 12,847 कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

देशात अकरा लाखांहून अधिक चाचण्या

भारतात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये, म्हणून सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यातच भारतात आत्तापर्यंत 11,91,946 कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची आवश्यक ती माहिती मिळू शकली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सर्वाधिक

देशातील विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 12,974 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 548 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

गुजरातमध्ये 5,428 कोरोनाग्रस्त रुग्ण

महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये सध्या 5,428 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 290 कोरोनाग्रस्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या 4,549 वर 

राजधानी दिल्लीत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आत्तापर्यंत 4,549 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये 64 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com