Assam Woman Officer Raided for Illegal Land Transfer Crores Recovered
Esakal
देश
हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त
बारपेटा जिल्ह्यात कार्यरत असताना नुपुर बोरा या महिला अधिकाऱ्याने हिंदू कुटुंबियांची जमीन बेकायदेशीरपणे मुस्लिमांना दिल्याचा आरोप तिच्यावर केला जात आहे. या प्रकरणानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झालाय.
आसाममध्ये प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या नुपूर बोरा हिच्यावर गंभीर असे आरोप करण्यात आले आहेत. बारपेटा जिल्ह्यात कार्यरत असताना हिंदू कुटुंबियांची जमीन बेकायदेशीरपणे मुस्लिमांना दिल्याचा आरोप तिच्यावर केला जात आहे. या प्रकरणानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झालाय. आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या विशेष टीमकडून तिच्यावर कारवाई केली जात आहे. पोलिसांनी निवासस्थानी छापा टाकल्यानंतर मोठं घबाड सापडलं आहे.

