Barmer Love Story Turns Tragic Woman Murdered by Boyfriend
Esakal
देश
६२० किमी ड्रायव्हिंग करत प्रियकराला भेटायला गेली, ५ दिवस सोबत राहिले; लग्नाचा विषय काढताच केली हत्या, शिक्षकाला अटक
Crime News : महिलेनं लग्नासाठी तगादा लावला होता आणि त्यानंतर पोलिसात तक्रारही दिली होती. याच वादातून संतापलेल्या शिक्षकाने महिलेची हत्या केली. राजस्थानच्या बाडमेर इथं सोमवारी घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय.
अंगणवाडीत सुपरवायजर म्हणून काम करणाऱ्या महिलेची सरकारी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. महिलेनं लग्नासाठी तगादा लावला होता आणि त्यानंतर पोलिसात तक्रारही दिली होती. याच वादातून संतापलेल्या शिक्षकाने महिलेची हत्या केली. राजस्थानच्या बाडमेर इथं सोमवारी घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय. महिलेचं नाव मुकेश कुमारी असं आहे. तर आरोपी शिक्षकाचं नाव मानाराम असं आहे.

