
नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी आढळला नर्सचा मृतदेह, बलात्कारानंतर हत्या केल्याचा आरोप
नवी दिल्ली : एक दिवसांपूर्वी नोकरीवर लागलेल्या तरुण परिचारिकेचा मृतदेह नर्सिंग होममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव (Unnao) येथे ही घटना घडली असून तिचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुलगी नर्स होती आणि शुक्रवारी तिचा कामाचा पहिला दिवस होता. रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिचा मृतदेह नर्सिंग होमच्या भिंतीला लटकताना आढळला. घटनास्थळी मुलीचा मृतदेह भिंतीला लटकलेला होता आणि लोक तिचे फोटो काढत होते. त्यानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. तिच्या कुटुंबीयांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी नवीन जीवन रुग्णालयात आणि नर्सिंग होम या घटनास्थळी धाव मृतदेह ताब्यात घेतला. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं उन्नावचे अतिरिक्त एसपी शशिशेखर सिंह यांनी सांगितलं.