Odisha Railway Accident: अपघातानंतर कोरोमंडल एक्स्प्रेस उद्यापासून पुन्हा धावणार

caromandal railway
caromandal railway

ओडिशातील बालासोर इथं झालेल्या भीषण रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला तर हजारावर लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी तपास सुरू आहे.

अपघातानंतर कोरोमंडल एक्स्प्रेस उद्यापासून शालिमार स्थानकावरून पुन्हा धावणार आहे. ट्रेन जुन्या वेळेवरच धावेल. अप (भुवनेश्वर) मार्गावर आतापर्यंत ४० गाड्या धावल्या आहेत, त्यापैकी २४ मालगाड्या आहेत.

डाऊन (हावडा साइड) मार्गावर एकूण ४९ गाड्या धावल्या आहेत, त्यापैकी २६ मालगाड्या आहेत. आतापर्यंत एकूण ५३६ लोकांना नुकसान भरपाई मिळाली आहे, अशी माहिती क्षिण पूर्व रेल्वेचे सीपीआरओ आदित्य कुमार चौधरी यांनी दिली. 

caromandal railway
Dheerendra Shastri यांच्याशी लग्न करू इच्छिणारी शिवरंजनी तिवारी आहे तरी कोण ?

बालासोर रेल्वे अपघातात एफआयआर दाखल-

बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये आयपीसीच्या कलम 337, 338, 304A आणि 34 आणि रेल्वे कायद्याच्या कलम 153, 154 आणि 175 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

या सर्व कलमांपैकी केवळ रेल्वे कायद्याच्या कलम 153 मध्ये कमाल पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, तर इतर कलमांमध्ये दोन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. ओडिशा पोलिसांनी आधी एफआयआर नोंदवला होता, मात्र आता सीबीआयने अपघाताचा तपास हाती घेतला आहे.

caromandal railway
Video: दोन वर्षाचा चिमुकला पडला बोअरवेलच्या खड्ड्यात! बचावासाठी अथक प्रयत्न सुरु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com