'दारु पिणारे खोटं बोलत नाहीत'; अधिकाऱ्याचा विचित्र दावा, पाहा VIDEO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

  liquor

VIDEO - 'दारु पिणारे खोटं बोलत नाहीत'; अधिकाऱ्याचा विचित्र दावा

कोरोना विरुद्धची लढाई अद्याप संपलेला नाही, सरकारकडून देशातील सर्वा नागरिकांना लस देण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या अनेक भागांमध्ये प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्रे अनिवार्य करण्यात आले आहेत. भोपाळपासून सुमारे 230 किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात केवळ संपूर्ण लसीकरण झालेले लोकांनाच दारू विकण्यात येईल नियम लागू केला.

येथे दारूची दुकानांमध्ये फक्त पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच दारू विकली जात आहे. परंतु, एका सरकारी अधिकाऱ्यास एखाद्याचे लसीकरण पुर्ण झाले आहे का हे कसे समजणार? लसीकरण पुर्ण झाले आहे का याची पडताळणी कशी करण्यात येईल असे विचारले असता, अधिकाऱ्याने एक विचित्र उत्तर दिले.

हेही वाचा: अन्नदात्याने सत्याग्रह करत अहंकाराला झुकवलं - राहुल गांधी

अधिकाऱ्याने सांगीतले की, "हा त्यांचा प्रामाणीकपणा आहे तो सांगेल. पिणारे खोटे बोलत नाहीत हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे. त्याला प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत की नाहीत हे तो ग्राहक स्वतः प्रामाणिकपणे सांगेल, माझा अनुभव आहे की दारू पिणारे खोटं बोलत नाहीत" असे पत्रकारांना सांगीतले, याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे आणि वापरकर्ते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रीया देत आहेत. बऱ्याच जणांनी यावर विनोदी प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.

हेही वाचा: येतेय Jeep ची सर्वात स्वस्त सब-कॉम्पॅक्ट SUV; जाणून घ्या डिटेल्स

दरम्यान मध्य प्रदेश राज्यातील आतापर्यंत 52 जिल्ह्यांमध्ये 7.88 कोटी लसीचे डोस दिले आहेत. खंडवा जिल्ह्यात आतापर्यंत 13.86 लाखाहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.

loading image
go to top