Model
Model

याला म्हणतात नशीब!, 60 वर्षांचा 'कामगार' झाला लखपती 'मॉडेल'

देवाच्या मनात आलं तर काहीही होऊ शकतं असं म्हणतात. कुणाचं नशीब कधी उजाळेल हे सांगता येत नाही.
Published on

Viral News: देवाच्या मनात आलं तर काहीही होऊ शकतं असं म्हणतात. कुणाचं नशीब कधी उजाळेल हे सांगता येत नाही. अनेकदा जीवापाड (Social Media News) कष्ट करणाऱ्यांना नशीब साथ देत नाही. दुसरीकडे काही न करताही नशीबानं बऱ्याचशा गोष्टी मिळाल्याची उदाहरणं आपल्या आसपास असल्याचे दिसून आले आहे. आताही सोशल मीडियावर अशीच एक घटना व्हायरल झाली आहे. त्यामध्ये एका रस्त्यावरच्या कामगाराला मोठी लॉटरी लागल्याचे दिसून आले आहे. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या त्या कामगाराकडे आता एक प्रसिद्ध मॉडेल म्हणून पाहिले जात आहे. सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. केरळमधल्या त्या 60 वर्षीय कामगाराच्या नशीबानं वेगळीच पलटी घेतली आहे. त्यामुळे अनेकांना नवल वाटले आहे.

प्रत्येक दिवशी जीवापाड कष्ट केलं तरच पोटाला अन्न मिळणार अशी गत त्या कामगाराच्या कुटूंबाची आहे. अशा त्या कामगाराचे नाव मम्मिका असे असून त्याच्यावर एका फोटोग्राफर्सची नजर गेली. तेव्हा त्यानं त्यांना चक्क मॉडेलिंगची ऑफर दिली. त्यामुळे त्या कामगाराचे नशीबच पालटले आहे. तो आता चक्क मॉडेलिंग करतो आहे. एरवी फाटक्या, मळकट कपड्यांमध्ये दिसणाऱ्या मम्मिकाच्या त्या सुटाबुटातल्या लूकनं सर्वांनाच प्रश्नात पाडले आहे. इंस्टावर त्यांचे फोटो जेव्हा व्हायरल झाले तेव्हा त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी त्याला भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहे.

Model
Video Viral करुन वासनांध हैवानांचा गायीवर बलात्कार; 4 नराधमांना अटक

गावात काम करणारा मजूर आता त्या गावातील प्रसिद्ध मॉडेल झाला आहे. सगळ्यांनी त्यांच कौतूकही केलं आहे. मम्मिकाचा मेक ओव्हर झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्याच्या फोटोंना कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची जोरदार चर्चाही सुरु आहे. आता तर मम्मिका यांच्याकडे ऑटोग्राफ घेणाऱ्यांची संख्याही वाढलीय. मम्मिका यांचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या त्या फोटोग्राफर्सचं नावं शारिक वायलिल (Shareek Vayalil) असं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com